आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र:कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा नवरात्रोत्सव यंदा ऑनलाईनच, महालक्ष्म्यअष्टक, सरस्वती स्तवन रुपात दिसणार महालक्ष्मी

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महालक्ष्मीची नऊ दिवसाची पूजा अशी

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीचा नवरात्रोत्सव म्हणजे चैतन्याचा झरा. नऊ दिवसांतील देवीची विविध रुपे, सजलेले मंदिर, भक्तीने ओसंडून वाहणारा मंदिरातील तिचा दरबार यंदा मात्र कोरोनामुळे प्रथमच सूना असेल. पण भक्तीने ओत:प्रोत भरलेल्या नजरेत देवीचे चैतन्यदायी रुप सामावणार आहे. कारण देवीभक्तांसाठी नवरात्रोत्सवाचा संपूर्ण सोहळा ऑनलाईन करण्यात आला असून लाईव्ह दर्शन अॅपच्या माध्यमातून नित्यपूजा, आरती, पालखी सगळे घरबसल्या पाहता येणार आहे. महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

महालक्ष्मीची नऊ दिवसाची पूजा अशी
- दि.१७ - शनिवार : कुण्डलिनी स्वरुपात (साडीचा रंग लाल)
- दि.१८ - रविवार- पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक (साडीचा रंग पितांबरी)
- दि.१९- सोमवार- नागकृत महालक्ष्मी स्तवन (साडीचा रंग केशरी)
- दि. २०- मंगळवार- सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम (साडीचा रंग निळा/जांभळा),
- दि.२१- बुधवार- गजारुढ अंबारीतील पूजा (साडीचा रंग लाल)
- दि. २२- गुरुवार- श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती (साडीचा रंग पांढरा)
- दि. २३- शुक्रवार- अगस्त्यकृत सरस्वती स्तवन (साडीचा रंग पिवळा)
- दि. २४- शनिवार- महिषासुरमर्दिनी (साडीचा रंग लाल )
- दि. २५- रविवार- अश्वारुढ - शालू

बातम्या आणखी आहेत...