आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाशी संबंधित परंपरा:शिवरात्री का साजरी करावी, पती-पत्नीने एकत्र का करावी शिव कुटुंबाची पूजा?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 1 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती तसेच संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करावी. महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदारासह महादेवाची पूजा करावी. असे केल्याने पूजा लवकर सफल होते आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती राहते.

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. घरातील मंदिरात प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा करावी. गणेशाची पूजा केल्यानंतर शिव-पार्वती, कार्तिकेय स्वामी, नंदी यांची पूजा करावी.

अशा प्रकारे महादेवाची पूजा करावी
शिवलिंगाला जल अर्पण दूध अर्पण करून पुन्हा जल अर्पण करावे. यानंतर हार, फुले, वस्त्र, जानवे इत्यादी पूजन सामग्री अर्पण करावी. चंदनाचा टिळा लावावा. बेलाची पाने, धोत्रा, शमीची पाने, रुईची फुले, गुलाब इत्यादी अर्पण करा. मिठाईचा नैवेद्य दाखवावा. ऊँ नम: शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. धूप-दिवे लावून आरती करावी. शेवटी पूजेमध्ये कळतनकळत झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. यानंतर प्रसाद वाटून स्वतः घ्यावा.

पं शर्मा यांच्यानुसार शिवरात्रीला पती-पत्नीने एकत्र शिवलिंगाची पूजा करावी. पूजेत शिव-पार्वती मंत्र ऊँ उमा महेश्वराय नमः मंत्राचा जप करावा. शिव-पार्वती या कुटुंबाचे देवता आहेत. पूजा केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. घरात सुख-समृद्धी नांदते.

महाशिवरात्री का साजरी केली जाते
आपण महाशिवरात्री का साजरी करतो याबद्दल अनेक प्रथा प्रचलित आहेत. एका मान्यतेनुसार, प्राचीन काळी शिव आणि पार्वतीचा विवाह माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला होता. दुसरी मान्यता अशी आहे की, या तिथीला शिव लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते.

शिवपुराण आणि लिंग पुराणानुसार, एके दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मा आपापसात वाद घालत दोन्ही देव स्वतःला आपणच वरिष्ठ असल्याचे सांगत होते. जेव्हा वाद खूप वाढला तेव्हा शिव लिंगाच्या रूपात तेथे प्रकट झाले. शिवजी म्हणाले की तुमच्यापैकी जो कोणी या लिंगाचा शेवट शोधेल, तो श्रेष्ठ असेल.

हे ऐकून ब्रह्मदेव एका टोकाकडे तर विष्णूजी दुसऱ्या टोकाकडे गेले. विष्णूदेवाला लिंगाचा शेवट मिळाला नाही आणि ते परतले. ब्रह्मदेवालाही अंत मिळत नव्हता, पण स्वत:ला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी त्यांना लिंगाचा अंत सापडला असे खोटे बोलले. त्यासाठी त्यांनी केतकीचे रोप सोबत घेतले. जेव्हा ब्रह्मदेव विष्णूदेवासमोर म्हणाले की त्यांना लिंगाचा शेवट सापडला आहे, तेव्हा केतकीच्या रोपानेही हे सत्य असल्याचे सांगितले.

त्यावेळी महादेव म्हणाले की ब्रह्मदेव खोटे बोलत आहेत. महादेवाने ब्रह्मदेवाला खोटे बोलल्याबद्दल शाप दिला की, आजपासून तुमची पूजा होणार नाही आणि माझ्या पूजेत केतकीचे फूल वापरले जाणार नाही.

लिंग प्रकट झाले तेव्हा ती माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. तेव्हापासून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्याची परंपरा प्रचलित आहे.

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोणते फायदे होतात?
शिवपूजेमध्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्र - ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधीपुष्टिवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्युमुख्य ममृतत्. या मंत्राचा जप केल्याने अज्ञात भीती दूर होते. मनाला शांती मिळते, एकाग्रता वाढते. अखंड नामजप केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि दुःखावर मात करण्याची व ती सहन करण्याची शक्ती मिळते.

बातम्या आणखी आहेत...