आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरात्री 1 मार्चला:वाराणसीचे तिळभांडेश्वर महादेव मंदिर, दरवर्षी तीळाएवढे वाढते येथे असलेले शिवलिंग

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 1 मार्चला शिवरात्री आहे. या दिवशी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन करण्याची विशेष परंपरा आहे. महादेवाच्या प्रसिद्ध तीर्थांपैकी उत्तर प्रदेशातील काशी (वाराणसी)चे विशेष महत्त्व आहे. काशीमध्ये विश्वनाथ मंदिराव्यतिरिक्त इतरही पौराणिक महत्त्व असलेले शिव मंदिर आहेत. अनेक मंदिरांचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. असेच एक प्राचीन मंदिर तिळभांडेश्वर आहे. या मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, प्रत्येक मकरसंक्रांतीला येथे स्थित असलेले शिवलिंग तिळाच्या आकाराएवढे वाढते. यामुळे या मंदिराला तिळभांडेश्वर म्हटले जाते. मंदिराशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत.

शिवरात्रीला तिळभांडेश्वर महादेव मंदिरात मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचणार आहेत. या उत्सवाव्यतिरिक्त सोमवार आणि प्रदोष व्रतालाही भाविक दर्शनासाठी पोहोचतात. कालसर्प दोषाच्या शांतीसाठी भक्त येथे पूजा करतात. मंदिरात अनेक देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत.

स्वयं प्रकट झाले आहे हे शिवलिंग
तिळभांडेश्वर महादेव शिवलिंगाच्या संदर्भात ते स्वयंभू शिवलिंग असल्याची श्रद्धा येथे प्रचलित आहे. हे क्षेत्र ऋषी विभांड यांचे तपस्थान होते. विभांड ऋषी येथे महादेवाची पूजा करत असत. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन देवाने वरदान दिले की, हे शिवलिंग दरवर्षी तिळाएवढे वाढत राहील. या शिवलिंगाच्या दर्शनाने अश्वमेध यज्ञात जे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य प्राप्त होते. तिळाच्या वाढीमुळे आणि विभांड ऋषींच्या नावावरून या मंदिराला तिळभांडेश्वर हे नाव पडले आहे.

दुसर्‍या मान्यतेनुसार या भागात प्राचीन काळी तिळाची लागवड केली जात असे. त्यावेळी या परिसरात शेतकऱ्यांना हे शिवलिंग दिसले होते. लोक शिवलिंगाची पूजा करू लागले. येथील लोक शिवलिंगावर तीळ अर्पण करायचे. त्यामुळे याला तिळभांडेश्वर असे संबोधले जाऊ लागले.

औरंगजेबाशी संबंधित मंदिराची कथा
मुघल सम्राट औरंगजेब काशीला आला होता अशी कथा येथे प्रचलित आहे. त्यावेळी हे मंदिर तोडण्यासाठी बादशहाने येथे सैनिक पाठवले होते. सैनिकांनी शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न करताच शिवलिंगातून रक्त वाहू लागले. हा चमत्कार पाहून सर्व सैनिक येथून पळून गेले होते.

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, एकदा इंग्रजांनी शिवलिंगाच्या वाढीचे सत्य तपासण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी शिवलिंगाभोवती घट्ट दोरा बांधला परंतु काहीवेळाने शिवलिंगाभोवती बांधलेला दोरा तुटून गेला.

बातम्या आणखी आहेत...