आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:‘फिल्टरिंग टाइम’पलीकडे एक सुंदर जग आपली वाट पाहतेय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या काळात तुमच्यापैकी स्वहितासाठी नव्हे, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी जे प्रार्थना, ध्यान करत आहेत ते आध्यात्मिकदृष्ट्या सांगायचे झाल्यास काळजी करतात.

आपल्यापैकी जे या काल्पनिक फिनिश लाइनच्या पलीकडे जाता येईल त्यालाच भविष्यातील आनंदाचा आपला भाग मिळू शकेल. मला अजूनही आठवते की, न्यूयॉर्कमध्ये दोन इमारतींवर हल्ला झाल्याची बातमी मी सप्टेंबर २०११ मध्ये पाहिली. मग मी हे शब्द प्रथम ऐकले - ओसामा, अल कायदा. किनारा सोडून समुद्र पुढे आला आहे, हे ऐकले तेव्हा सुनामी हा शब्द मी प्रथमच ऐकला मी यापूर्वी कधीही पॅनडेमिक (महामारी) हा शब्द ऐकला नव्हता. कोरोना हा शब्दही यापूर्वी कधी ऐकला नव्हता. अनेक वेळा निसर्गनिर्मित, मानवनिर्मित संकटे आली. आपण त्यांना कठीण काळ, आव्हानात्मक वेळ, वाईट काळ इ. म्हणतो. कोणतेही विशेषण द्या, परंतु त्यांना ‘फिल्टरिंग टाइम्स’ असे म्हणतात. म्हणजेच जिथे विजेता इतरांतून फिल्टर होतो. उदा. हे सर्व संपेल तेव्हा ज्यांच्याकडे विशेष क्षमता आणि योग्यता असतील त्यांनाच भविष्य असेल आणि जे इतरांच्या भरवशावर जगत आहेत ते निघून जातील, फिल्टर होतील.

केवळ प्रेझेंटेशन तयार करण्यात सक्षम, दिखाव्यामागे लपणारे अनेक जण असतात, त्यांचे भविष्य अंधकारमय होऊ शकते. म्हणून त्याला फिल्टरिंग टाइम असे म्हणतात. चांगल्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक जण पैसे कमावतो, परंतु फिल्टरिंगच्या काळात गुंतवणूक आणि पैशांची समज असलेलेच पैसा कमावतील. ज्यांच्याकडे चांगली उत्पादने, चांगले व्यवसाय मॉडेल आहेत त्यांना कठीण बदलांमधून जावे लागेल, परंतु भविष्यात ते अधिक चांगल्या प्रकारे उदयास येतील. परंतु ज्यांच्याकडे चांगली उत्पादने नाहीत, जे त्यांच्या विपणन कौशल्यामुळे चालत आहेत, ते या काळात फिल्टर होतील. म्हणूनच याला फिल्टरिंग टाइम म्हणतात.

आता लॉकडाऊननंतर आपले आयुष्य, व्यवसाय पूर्णपणे पूर्ववत होईल हे शक्य नाही. अजूनही व्यत्यय येईल. प्रथम एखाद्या मुलासारखे आयुष्य रांगण्यास सुरुवात करील, मग चालेल आणि नंतर काही काळाने पळेल. त्यानंतर शर्यतीत भाग घेता येईल. आणि आपल्यापैकी जो कोणी या काल्पनिक फिनिश लाइनच्या, या फिल्टरिंग टाइमच्या पलीकडे जाऊ शकेल त्यालाच भविष्यातील आपला वाटा, आनंद मिळेल. आणि इतर सर्व फिल्टर होतील.

मी अशा सर्व उद्योजकांचे कौतुक करू इच्छितो, ज्यांनी उत्कृष्ट उत्पादने तयार केली, चांगल्या सेवा दिल्या, सिद्ध व्यवसाय मॉडेल दिले, जे या वाईट काळाचा सामना करत आहेत. गरजूंना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक पुढे आले. अनेक उद्योजकांनी आपल्या अतिरिक्त पैशांचा बिनशर्त उपयोग करून जगासाठी योगदान दिले.

पण मला सर्वांना हे सांगायचे आहे की, एखाद्याने चेक लिहून देणे याचा अर्थ असा नाही की त्याला काळजी आहे. काही उद्योजकांनी कठीण काळातही कर्मचाऱ्यांना पगार दिला. त्यांची कमाई कमी होती किंवा जवळजवळ थांबली होती, तरीही असे केले कारण त्यांना काळजी होती. अनेक जणांनी आधीच इतकी कमाई केली की त्यांना एक दिवसही काम करावे लागणार नाही, पण तरीही त्यांची रात्रीची झोप उडाली होती. सर्व काही व्यवस्थित सुरू झाल्यावर व्यवसायाला कसे पुढे आणता येईल याचा ते विचार करत राहिले, कारण त्यांना माहीत आहे की शेकडो-हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्याचे हृदय अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी धडधडत आहे, याचा अर्थ त्यांना काळजी आहे.

याप्रमाणेच तुम्ही कुटुंबातील मानसिक व भावनिकदृष्ट्या सर्वात बलवान आहात आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावरच तुमचे कुटुंब संकटाचा सामना करत असेल तर याचा अर्थ तुम्ही काळजी करता. आणि या काळात तुमच्यापैकी स्वहितासाठी नव्हे, जगासाठी जे प्रार्थना, ध्यान करतात ते आध्यात्मिकदृष्ट्या काळजी करतात. सर्वांनी आपापल्या पद्धतीने काळजी घ्या. या फिल्टरिंग टाइमनंतर आपण एक विजेता म्हणून कसे उदयास येऊ याचा आणि आपल्या व जगाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा विचार करू. या काल्पनिक फिनिश लाइनच्या, फिल्टरिंग टाइमच्या पलीकडे एक सुंदर जग आपली प्रतीक्षा करत आहे.

महात्रया रा, आध्यात्मिक गुरु

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser