आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:आध्यात्मिक प्रवासात अनुभवांना महत्त्व असते

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आध्यात्मिक प्रवासात एखादा थांबा हवा असतो तेव्हा आपल्यात जास्त भूकंप होतो. आपल्या बुद्धिमत्तेने प्रक्रियेला गती कशी द्यावी, याचा आपण विचार करतो...

ऋषी योगी, महात्म्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. बाह्य जगाच्या गोंधळापासून स्वत:ला दूर ठेवले, वाईट विचारांना आपल्यावर प्रभुत्व गाजवू दिले नाही व निर्लिप्ततेकडे जाताना चैतन्यावस्थेत विचारशून्य अवस्थेकडे गेले. पण तुम्ही काय करत आहात? आपल्या रोजच्या दिनचर्येत देवघरात झटपट ३-४ मिनिटे घालवून किंवा अर्जंट पूजा करून मोक्षाची इच्छा करता. देवाला शरण जात नाही, फक्त देवाला मागता की, अमुक पाहिजे, परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजे. हे देवाबरोबरचे आपले नाते आहे. आपल्या आध्यात्मिकतेची हीच पातळी आहे. आपण अध्यात्माची पुस्तके विकत घेऊ शकता, उपनिषदे वाचल्याने तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. मग खऱ्या गुरूची पाळी येते, त्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, तुम्ही अद्याप यासाठी तयार नाही. तेथे जाण्यासाठी अजून बराच प्रवास बाकी आहे. तुम्ही सात स्वरही शिकला नाहीत आणि संगीत मैफलीची परवानगी मागत आहात. पण दुर्दैवाने कोणताही गुरू स्पष्ट सांगत नाही. अर्जुनदेखील कोणतीही तयारी न करता रणांगणात पोहोचला होता, आपल्या क्षमता त्याने अभ्यासावरून पारखल्या होत्या. अर्जुनाने कधीही युद्धाला तोंड दिले नव्हते. जेव्हा अर्जुन युद्धाची तयारी न करता रणांगणावर आला तेव्हा त्याच्या डोक्यात एकच गोंधळ होता. मनात विचारांचे काहूर होते. काहीही स्पष्ट नव्हते.

गुरूला तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा त्यांना सांगावे की, तुम्ही त्यासाठी तयार नाही. पण ते आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील तेव्हा अध्यात्माबद्दलचे हे ज्ञान शांततेऐवजी विचारांचे वादळ आणते. आणि प्रश्नांचा गुंता वाढत जातो. उदा. कर्माचे विज्ञान काय आहे? सध्या कर्मांचे विज्ञान समजणे महत्त्वाचे नाही, तर आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण निःस्वार्थपणे जगणे महत्त्वाचे आहे. आपण कर्माचा संचय करत राहता आणि कर्ज वाढत जाते. अशा परिस्थितीत दिवसातून किमान एकदा तरी पूर्ण नि:स्वार्थीपणा आपल्यात आणणे आवश्यक आहे. हा संपूर्ण दिवस फक्त मी, माझा किंवा माझ्याबद्दलच नाही, तर आयुष्यात असे अनेक क्षण असावेत ज्यामध्ये आपण स्वतःसाठी, इतरांसाठी आणि इतरांना पुढे करून जगता. कर्माची विज्ञान संकल्पना समजून घेण्यापेक्षा निःस्वार्थीपणाने जीवनात समानता आणणे चांगले. परंतु प्रश्नोत्तरांमध्ये गुंतून राहिल्यास आपल्या मनात १५ नवीन प्रश्न निर्माण होतात व गोंधळ होतो.

आध्यात्मिक प्रवासात एखादा थांबा हवा असतो तेव्हा आपल्यात जास्त भूकंप होतो. आपल्या बुद्धिमत्तेने प्रक्रियेला गती कशी द्यावी, याचा आपण विचार करतो. उदा. ८-१० वर्षांच्या मुलांना विश्लेषण करण्यास, विचारी होण्यास सांगणे निरर्थक आहे. त्यांना काही समजावून सांगण्यासाठी काही क्रियांचा अवलंब करावा लागतो. प्रायोगिक अनुभवानंतर त्यांना त्याचे व्यावहारिक ज्ञान दिल्यानंतर त्यांना ती गोष्ट समजेल. परंतु, त्यांना बसून विचार करण्यास सांगितले गेले तर ते अनुभवल्याशिवाय हे त्यांना कधीही समजणार नाही.

आपण आध्यात्मिक अनुभवांकडे जायला हवे, परंतु आपल्याला आध्यात्मिक आनंदाकडे जायचे असते. आपल्या अनुभवांच्या खोलीत कसे उतरायचे, यावर भर दिला पाहिजे, परंतु अध्यात्माच्या संकल्पनेत जाण्यासाठी आपण अनेक पायऱ्या चढत राहतो व मनात गोंधळ सुरू होतो. भौतिक जगात विचारपूस केली जाते, गोष्टींना आव्हान देण्याची गरज असतेे. आपण विचारू शकता की, हे धोरण का उपयोगी पडत नाही किंवा मी चौथ्या क्रमांकावर का आहे, समोरचा एक नंबरवर का आहे? परंतु आध्यात्मिक जगात तुम्ही आपल्या पातळीवर प्रश्न विचारत आहात की आपल्या पातळीपेक्षा वेगळा, हे तुम्हाला माहिती नाही.

आपल्यावर प्रेम दाखवण्याचा अर्थ नेहमीच हो म्हणणे असे नाही. कधी कधी नाही म्हणणेही आवश्यक असते. काही वेळा गुरूंना सांगणे आवश्यक आहे की तुम्ही यासाठी तयार नाही.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू
infinitheism.com/wisdom

बातम्या आणखी आहेत...