आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक जीवन:श्रद्धा कायम ठेवा, कदाचित ईश्वर आपल्याला तयार करत असावा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नकारात्मक वातावरणातही कसे जगावे, हे सांगत आहेत प्रख्यात आध्यात्मिक गुरू फक्त दिव्य मराठीत

एकदा एका माणसाला स्वप्नात दिसले की, आपण ईश्वरासोबत समुद्रकिनाऱ्यावर चालत आहोत. आयुष्यातील अनेक दृश्यं आकाशात दिसत आहेत. वाळूत पायाचे ठसे आहेत असे प्रत्येक दृश्यात त्याला दिसले. काही वेळा ठशांचे जोड दिसले, तर काही वेळा एकच ठसा. त्यामुळे तो माणूस चकित झाला. कारण, जेव्हा तो आयुष्यात त्रस्त होता तेव्हा त्याच्या पायांच्या ठशांचा एकच जोड दिसत होता. त्यामुळे तो ईश्वराला म्हणाला, ‘मी नेहमी तुझ्यासोबत राहीन, असे वचन आपण मला दिले होते. पण मला असे दिसले की, मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा वाळूत ठशांचा एकच जोड होता. जेव्हा मला सर्वाधिक गरज होती तेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हता का?’ ईश्वराने उत्तर दिले, ‘तुला पायाच्या ठशांचा एकच जोड दिसत होता तेव्हा मी तुला कुशीत उचलून घेतले होते.’

श्रद्धा म्हणजे ईश्वर एकतर आपल्यासोबत किंवा कुशीत घेऊन चालेल हा विश्वास. श्रद्धेचे स्थान म्हणजे तुमचे हृदय. तुमच्या पंचेंद्रियांतून जाणारी कुठलीही गोष्ट तुमच्या श्रद्धेला स्पर्श करू शकत नाही. कारण, इंद्रियांची पोहोच हृदयापर्यंत नाही. श्रद्धा ही हृदयाची, तर विश्वास मनाची बुद्धिमत्ता. हृदयाला कुठल्या पुराव्याची गरज नाही. हृदय प्रत्येक अनुभवाद्वारे आपल्या श्रद्धेची मुळं मजबूत करते, तर मन प्रत्येक अनुभवाचा वापर आपल्या विश्वासाचा आधार कमकुवत करण्यासाठी करते.

श्रद्धा विज्ञानविरोधी नाही, ती फक्त विज्ञानाच्या समजण्यापलीकडची गोष्ट आहे. प्रत्येक प्रवासाची सुरुवात एक श्रद्धा आहे. आपण पोहोचू, यशस्वी होऊ ही श्रद्धा. जे आपण पाहू शकत नाही, जे सध्या घडलेले नाही, जे कधी सिद्ध करता येऊ शकत नाही, त्यावर विश्वास ठेवण्याची क्षमता म्हणजे श्रद्धा. जे आपण पाहू शकत नाही त्याचा अर्थ म्हणजे विश्वास असेल, तर त्याचे बक्षीस हे असेल की ज्यावर तुमचा नेहमी विश्वास होता ते एक दिवस तुम्ही पाहाल.

एकदा हनुमंत श्रीरामाला म्हणाले, ‘हे देवा, तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ असे काहीतरी आहे.’ श्रीरामांनी चकित होऊन हनुमंतांना विचारले, ‘ती कोणती गोष्ट आहे?’ हनुमंत म्हणाले, ‘तुम्ही नौकेच्या मदतीने नदी पार केली, पण मी तुमच्या नावाच्या शक्तीने पूर्ण समुद्रच ओलांडला. तुमच्या नावानेच समुद्रात दगड तरंगले. त्यामुळे तुमच्यापेक्षा तुमचे नावच श्रेष्ठ आहे.‘ ‘श्रद्धेचा विषय’ (व्यक्ती, ईश्वर, वस्तू, विचार आदी) नव्हे, तर ‘श्रद्धा’च चमत्कार घडवते. श्रद्धेचा विषय फक्त माध्यम असतो. जीझससाठी ‘अब्बा’ होते, मदर तेरेसांसाठी ‘जीझस’, द्रौपदीसाठी ‘कृष्ण’, पैगंबरांसाठी ‘अल्लाह,’ एकलव्यासाठी ‘द्रोण’, हनुमानासाठी ‘राम’ होते. तरीही सर्वांनी आपल्या आयुष्यात श्रद्धेची चमत्कारिक शक्ती अनुभवली. त्यावरून ‘श्रद्धेचा विषय’ नव्हे, तर त्या ‘विषयात श्रद्धे’मुळे चमत्कार घडतात हे सिद्ध होते. जसे विचार त्याला जन्म देणाऱ्या मनापेक्षा जास्त शक्तिशाली असतात, त्याचप्रमाणे श्रद्धाही ‘विषया’पेक्षा जास्त शक्तिशाली आहे. मात्र, माणूस ते समजण्यात चूक करतो. जेव्हा त्याला काही चमत्कारिक अनुभव येतो तेव्हा तो श्रेय ‘श्रद्धेच्या विषयाला’ देतो, याउलट ते चमत्कार त्याच्या ‘विषयातील श्रद्धे’मुळे होतात. समजून घेण्याच्या या चुकीमुळे तो ‘आस्थेच्या विषयाला’ खुश करण्यासाठी अनुष्ठान करतो. तो आपल्या ‘श्रद्धेचा विषय’ही बदलतो. ईश्वराच्या एका स्वरूपाऐवजी दुसरे. तो श्रद्धेव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. प्रश्न हा नाही की, तुमचा ‘ईश्वर’ कोण आहे, प्रश्न हा आहे की, ईश्वरावर तुमची ‘श्रद्धा’ किती दृढ आहे?

श्रद्धा नसेल तर तुमच्या मनात भीती असेल. पण जेव्हा तुम्ही श्रद्धावान व्हाल तेव्हा कुठलीही भीती राहणार नाही. श्रद्धा आणि भीती एकत्र राहू शकत नाहीत. माणसाच्या बुद्धिमत्तेतून विकल्प निर्माण होतात आणि परिणाम त्या ईश्वराच्या बुद्धिमत्तेतून. श्रद्धा म्हणजे हे जाणून घेणे की, आपली योजना एखाद्या वेळी अयशस्वी झाली तर आपल्यासाठी आपली योजना लागू करता यावी. त्याची योजना तुमच्यासाठी नेहमीच योग्य असेल. त्यामुळे तुम्ही श्रद्धेत ‘माझ्याबाबत हे का होत आहे?’ हे विचारत नाही. पण तुम्ही श्रद्धेसह हे विचारता, ‘हे देवा, मला यात गुंतवून तुम्ही मला कोणत्या गोष्टीसाठी तयार करत आहात? त्यामागे तुमचा मोठा उद्देश काय आहे, जो मी अद्यापपर्यंत पाहू शकत नाही?” ज्या परमशक्तीने तुम्हाला या परिस्थितीत आणले तीच बाहेरही काढेल.’

- तुमचा ईश्वर कोण आहे हा प्रश्न नाही, तर ईश्वरावरील तुमची ‘श्रद्धा’ किती दृढ आहे हा प्रश्न आहे

- काळानुसार श्रद्धा वाढते. विश्वास काळानुसार कमजोर होतो. सर्वांच्या श्रद्धेत श्रद्धा असेलच असे नाही, हे सत्य आहे. त्यापेक्षाही मोठे सत्य हे आहे की, कोणीही आपल्या विश्वासावर पूर्ण विश्वास ठेवत नाही.

- श्रद्धा नसेल तर तुम्ही भयग्रस्त असाल, पण श्रद्धेची ओळख पटेल तेव्हा कुठलीही भीती उरणार नाही. श्रद्धा व भीती एकत्र राहू शकत नाहीत.

महात्रया रा, आध्यात्मिक गुरू

infinitheism.com/wisdom

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser