आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:जीवन अधिक चांगले करण्यासाठी ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’ स्वीकारा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपला दृष्टिकोन एक मानसिक चष्मा आहे, त्याद्वारे आपण जीवन पाहता. हा चष्मा खराब झाला तर जग घाणेरडे दिसेल. ज्यांचा चष्मा सुंदर आहे त्यांच्यासाठी जग सुंदर आहे. ‘मी फक्त डोळ्यांवर विश्वास ठेवतो’, हे एक निरुपयोगी उदाहरण आहे. सत्य म्हणजे ‘तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्हाला दिसेल.’ तुम्हाला जे पाहिजे आहे ते दिसेल. समस्येकडे पाहण्याची पद्धत हीच एक समस्या आहे. तुम्हाला एका दृष्टिकोनाची आवश्यक आहे. या मानसिक चष्म्यांपैकी एक जगाला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर नेणारा आहे. प्रबुद्ध मानवांचा विश्वास आहे की ‘नेहमीच एक चांगला मार्ग असतो ...’ आणि त्याचे उदाहरण म्हणजे ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’ (इकॉनॉमी ऑफ एफर्ट््स). हे प्रयत्नांच्या मूल्याबद्दल नाही, तर याचा अर्थ आहे ‘कमाल प्रयत्नांतून किमान फळा’ऐवजी ‘किमान प्रयत्नांतून कमाल फळ’ मिळवण्याच्या दिशेने जाणे. हे स्वत:चा अहंकार सुखावण्यासाठी अनावश्यक प्रयत्न व कठोर परिश्रमांपासून स्वत:ला मुक्त करणे आहे. म्हणजेच प्रत्येक प्रयत्नात अधिक प्रयत्न व परिणामकारकता असणे, जेणेकरून अजून बरेच काही करता यावे.

हे सर्व गोष्टींच्या पुनर्रचनेने सुरू होते. प्रत्येक वस्तूसाठी एक जागा आणि सर्व वस्तू त्यांच्या जागेवर. मग प्रत्येक गोष्टीसाठी निश्चित वेळ आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर. यासाठी कोणत्याही उपकरणाची नव्हे, तर शिस्तीची आवश्यकता आहे. एखादा मूर्ख माणूस उपकरणांसाठीही मूर्ख असतो. उदा. रविवारी सकाळी ६ ते ८ अभ्यास, वीकेंड ‘तंत्रज्ञानमुक्त’ ठेवून कुटुंबासमवेत वेळ घालवणे, रोज योग करणे इ. ठरवणे. म्हणजेच ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’.

कुणी तुमच्या तुलनेत ७०% कार्यक्षमतेसह काम करू शकत असेल तर त्याला ते करू द्या. प्रत्येक गोष्टीसाठी ‘मी, मी, मी’ ओरडणे थांबवा आणि कामाची विभागणी करा. आपल्या टीमवर विश्वास ठेवा. इतर जे करू शकतात ते करू नका. कदाचित तुम्ही ते काम इतरांपेक्षा १० पट चांगले करू शकाल, परंतु आपण १० जणांचे काम करू शकत नाही. म्हणून आपण एकटे जे करू शकता त्याकडे लक्ष द्या. हीच ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’ आहे.

चेकलिस्टमधून जीवनात पुनरावृत्ती होणाऱ्या कामांचे नीट नियोजन करा. उदा. वारंवार प्रवास करत असाल तर प्रवासाची चेकलिस्ट ठेवा. वारंवार करण्याच्या गोष्टी कागदावर लिहून ठेवल्यास त्या लक्षात ठेवण्याची गरज नसते आणि मेंदू विचार करण्यास मोकळा राहतो. ही ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’ आहे.

प्रत्येक चुकीनंतर त्याच्या कारणाचे निराकरण करा. चुकांना शिकण्याची संधी माना. तुम्ही चुका रोखू शकत नाही, पण त्यांची पुनरावृत्ती थांबवू शकता. हीही ‘प्रयत्नांची अर्थव्यवस्था’ आहे.

प्रत्येकाच्या जीवनात चिंता आणि प्रभावाचे एक चक्र असते. जगातील प्रत्येक जण शिक्षित झाला पाहिजे, हे चिंता चक्र आहे. आपण नोकराच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करावा, हे प्रभाव चक्र. ‘इतर लोक असे का आहेत?’ हे चिंता चक्र, तर ‘मला हवा असलेला बदल मीच करीन’ हे प्रभाव चक्र आहे. तुम्ही प्रभाव चक्राकडे जितके जास्त लक्ष द्याल तितके ते मोठे होईल. अशा प्रकारे आपण काहीही अधिकाधिक करण्यास सक्षम व्हाल. चिंता चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास प्रभाव चक्र छोटे होऊन जे पूर्वी शक्य होते तेही अशक्य होईल. एकंदरीत याचा अर्थ असा की तुम्ही जिथे आहात तिथूनच प्रारंभ करा व मग अशी वेळ येईल की तुम्ही तुमच्या चिंतांवरही प्रभाव टाकू शकाल. जे काम करणे आवश्यक ते करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच जे अनावश्यक काम न करणे गरजेचे आहे. उदा. १० दिवसांत होणारे काम १० महिन्यांत आणि १० महिन्यांत होणारे काम १० दिवसांत करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. कामात बुद्धिमत्ताच प्रयत्नांची अर्थव्यवस्था असते. कामाच्या प्रक्रियेत उत्कृष्टता आणल्याशिवाय निकाल उत्कृष्ट असू शकत नाहीत. म्हणून नेहमी स्वत:ला विचारा, ‘मी प्रक्रिया कुठे सुधारू शकतो?’ व ‘मी प्रक्रिया कुठे सुधारली?’ केवळ या पद्धतींद्वारे आपण किमान प्रयत्नांनी कमाल फळ मिळवू शकता.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू
infinitheism.com/wisdom

बातम्या आणखी आहेत...