आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:आपण बदल घडवावा म्हणूनच आयुष्य परीक्षा घेतं

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य आपली अनेकदा परीक्षा घेतं. बऱ्याच वेळा ते शरीराचीही परीक्षा घेतं. तो रोग किंवा दुखापतही असू शकते. मग आयुष्य विचारांच्या पातळीवर आपली परीक्षा घेतं. ही बाब आपल्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करेल. आपण कोणत्या एका दिशेने विचार करत असताना त्यात अचानक व्यत्यय येईल, कोणीतरी विचारांमध्ये अडथळा आणेल, त्यांची पद्धत बदलतील. असं होणं कधी कधी तुमच्या मूल्यांसाठीही आव्हानात्मक ठरेल. या जगात अयोग्य किंवा बिनशर्त बदल असे काहीही नाही. उदाहरणार्थ, समजा आपण सारे आयुष्य खोटे बोलत आहोत आणि तरीही सर्व काही व्यवस्थित चालू आहे. परंतु एके दिवशी काहीतरी चुकते आणि यापुढे नेहमी सत्य बोलायचे असे आपण ठरवतोे. हे निश्चित करतानाच कोणते तरी आव्हान समोर येईल. आपल्या मनाला लगेच मोह होईल की, खोटे बोलून या परिस्थितीतून मार्ग काढावा. पण खरे बोललो तर अडीच लाख रुपये दंड भरावा लागेल. पण असे नेहमीच एक कोणते तरी आव्हान असेलच असेल.खरं तर आपला देवावर कधीच विश्वास नव्हता. अचानक श्रद्धा हा घटक तुमच्या आयुष्यात येतो आणि तुमच्यामध्ये खूप श्रद्धा जागृत होते. यानंतर असे होऊ शकते, तुम्हाला जे पाहिजे होते ते आयुष्यात मिळू शकत नाही. मग आपण विचार करू लागता की श्रद्धेचा खरोखर काही उपयोग होतो की नाही? याचा काही अर्थ आहे का? म्हणूनच बिनशर्त आणि अयोग्य बदल असे काहीही नाही.

आयुष्याच्या प्रत्येक अंगाने स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे असे आपल्याला वाटले की, आयुष्य लगेचच या बदलाच्या परीक्षेसाठी काही अनुभव देतच देतेे. हे उदाहरणाने समजून घेऊ. जेव्हा पृथ्वीवर बी पेरले जाते तेव्हा पृथ्वी कधीही कोणत्याही बियाण्यावर दया दाखवत नाही. खरं तर पृथ्वी बियाण्यास मदत करू शकत नाही, उलट त्याविरुद्धच कार्य करते. पृथ्वी बियांवर जो दबाव टाकते, त्यातूनच अंकुर फुटण्यास मदत होते. म्हणजेच बीज पृथ्वीच्या विरुद्ध असले पाहिजे. पृथ्वी बीजाबाबत सौम्य किंवा हळुवार असेल तर उगवण होणार नाही. बऱ्याच बिया पृथ्वीच्या दबावाचा प्रतिकार करू शकत नाहीत आणि तशाच मरतात. आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच माहितीही नसते. परंतु काही बिया पृथ्वीचा दाब सहन करतात आणि एक लहान, नाजूक हिरवा कोंब बाहेर येतो. आता हे आश्चर्यकारक आहे की, जी पृथ्वी आतापर्यंत त्या बीजाविरुद्ध काम करीत होती तीच आता त्या बीजासाठी कार्य करण्यास सुरुवात करते म्हणजे जोपर्यंत आपण आपली क्षमता काय आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत पृथ्वी तुम्हाला मदत करत नाही. एकदा आपण काय करू शकता हे सिद्ध झाले की, धरती तुमच्या बाजूने कार्य करण्यास सुरुवात करते .आयुष्यातही असेच घडते. ते आपल्याला आव्हान देते, परीक्षा घेते. एकदा आपण हा बदल सिद्ध केला की मग एरवी तुमच्याविरुद्ध असणारे आयुष्य तुमचे समर्थन करण्यास सुरुवात करते. म्हणूनच ते आपल्या मूल्यांची परीक्षा घेते, तुमच्या भावनांना आव्हान देते.

जीवन अनेक वेळा भावनिक पातळीवर खळबळ माजवते आणि मग ते एक चूक करते. आत्म्याला, त्याच्या उत्साहाला आव्हान देते आणि जेव्हा ते असे करते तेव्हा माणसाचे मोठेपण, त्याची क्षमता त्याच्यातूनच प्रकट होते आणि आपण काय करू शकतो हे सांगते. जेव्हा तुम्ही माणसांचा उत्साह पाहता की, ते आयुष्यातील आव्हानांना तोंड देतात आणि त्यांच्यावर कशा प्रकारे विजय मिळवतात तेव्हा त्या महान प्रेरणादायक कथा बनतात. आपल्याला यासाठी इतिहासाची पुस्तके वाचण्याची आवश्यकता नाही. आपल्या सभोवताली पाहा, आपल्या कुटुंबात पाहा. आपल्याबरोबर राहणाऱ्या लोकांमध्ये इतकी प्रेरणा आहे की ते आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी मार्गदर्शक बनू शकतात. आपल्याला फक्त मनुष्याच्या आत्म्याची शक्ती, त्याच्या उत्साहाची शक्ती वापरण्याची आवश्यकता आहे.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरु

बातम्या आणखी आहेत...