आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश नवमी 8 जूनला:या दिवशी भगवान शिव-पार्वतीची विशेष पूजा आणि व्रत केल्याने वाढते सौभाग्य, नष्ट होतात पाप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. या दिवशी महेश नवमी साजरी केली जाते. या दिवशीच माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे माहेश्वरी समाजाकडून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी हे व्रत 8 जून रोजी राहील. ज्येष्ठ महिन्यात शिवलिंगाला जल अर्पण केल्याने सर्व प्रकारचे पाप दूर होतात. म्हणूनच महेश नवमीला भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करण्याचा नियम आहे.

पूजन विधी
1. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. उत्तरेकडे तोंड करून महादेवाची पूजा करावी.
2. भगवान शिव-पार्वतीची सुगंध, फुले आणि बेलाच्या पानांनी पूजा करावी. शिवलिंगाला दूध व गंगाजलाने अभिषेक करावा.
3. शिवलिंगावर बिल्वपत्र, धोत्रा, फुले आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावे. अशा प्रकारे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

यामुळे साजरी केली जाते महेश नवमी
महेश्वरी समाजातर्फे महेश नवमी खास साजरी केली जाते. मान्यतेनुसार माहेश्वरी समाजाचे पूर्वज क्षत्रिय वंशाचे होते. काही कारणास्तव त्यांना ऋषीमुनींनी शाप दिला होता. त्यानंतर या दिवशी भगवान शंकराने त्यांना शापातून मुक्त केले आणि आपले नावही दिले. या समाजाच्या पूर्वजांनी क्षत्रिय कर्म सोडून केवळ भगवान शंकराच्या आज्ञेने वैश्य किंवा व्यावसायिक कार्य स्वीकारले, अशी मान्यता आहे.

ज्येष्ठामधील शिवपूजेचे महत्त्व
ज्येष्ठा महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण केले जाते. ज्येष्ठ महिन्यात भगवान शंकराला गंगाजल आणि सामान्य पाण्यासोबत दूधही अर्पण केले जाते. स्कंद आणि शिवपुराणानुसार या महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...