आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे. या सणाचा थेट संबंध आपला ग्रह पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकरमध्ये येतो. यामुळे मकरसंक्रांतीचा सण या दिवशी साजरा केला जातो. देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेळे नाव आणि प्रथेनुसार हा सण साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला या सणाशी संबंधित पाच खास गोष्टी सांगत आहोत...
1) ज्योतिष दृष्टिकोनातून
ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांती अत्यंत खास सण आहे. धर्मग्रंथांमध्येसुद्धा या सणाचा उल्लेख आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि यासोबतच उत्तरायण सुरु होते. हा शुभकाळ मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी गेले होते, यामुळे हा दिवस सुख-समृद्धीचा दिवसही मानला जातो. या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. यामुळे मकरसंक्रांतीला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
2) संस्कृतीनुसार
भारतामध्ये सांस्कृतिक विविधतांमध्ये मकरसंक्रांतीचेसुद्धा एक विशेष महत्त्व आहे. देशातील अनेक भागांमध्ये हा सण साजरा केला जातो परंतु प्रत्येक राज्यात या सणाचे नाव आणि प्रथा वेगवेगळ्या आहेत. उदा. देशातील दक्षिणेकडील राज्य केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये या सणाला फक्त संक्रांती म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हटले जाते आणि येथे चार दिवस हा सण साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणामध्ये या सणाला लोहडी म्हटले जाते. आसाममध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकरसंक्रांती म्हटले जाते.
3) खान-पान आणि दानाचेही विशेष महत्त्व
मकरसंक्रांतीला तिळाचे उटणे लावून स्नान केले करण्याची धार्मिक मान्यता आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक जमा होतात आणि यात्राही भारावली जाते. खिचडी बनवली जाते आणि तूप, गुळासोबत सहकुटुंब खाल्ली जाते. तीळ-गुळाचे लाडू या काळात खाल्ले जातात. तीळ, गूळ, खिचडी, छत्री आणि वस्त्र दानाचे विशेष महत्त्व या सणामध्ये आहे. महिला सौभाग्याशी संबंधित वस्तू दान करतात.
4) सूर्यदेवाची प्रसन्नता
स्नान आणि दान करण्यामागचे कारण म्हणजे यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि जीवन यशस्वी तसेच समृद्ध करतात. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर दान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकरसंक्रांतीला सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले होते यामुळे हा दिवस सुख आणि समृदीचा दिवस मानला जातो.
5) वसंत ऋतूची सुरुवात
मकरसंक्रांतीनंतर थंडी म्हणजेच हिवाळा ऋतू समाप्त होऊ लागतो आणि उन्हाचा प्रभाव वाढू लागतो. सूर्य उत्तरायण झाल्यामुळे असे घडते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. एकूणच वसंत ऋतूचे आगमन होते आणि वातावरण बदलते. मान्यतेनुसार महाभारतामध्ये भीष्म पितामह यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीचा प्राण त्याग केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.