आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी (पाहुणे)ला देवता मानण्यात आले आहे. पाहुणे येण्याची कोणतीही तिथी आणि वेळ निश्चित नसते यामुळे त्यांना अतिथी म्हणतात. मनुस्मृतीमध्ये पाहुण्यांशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. एखाद्या घरामध्ये या 4 गोष्टी उपलब्ध नसतील तर तेथे पाहुणे म्हणून जाऊ नये.
श्लोक
आसनाशनशय्याभिरद्भिर्मूलफलेन वा।
नास्य कश्चिद्वसेद्गेहे शक्तितोनर्चितोअतिथिः।।
अर्थ - ज्या व्यक्तीच्या घरामध्ये बसण्यासाठी 1. आसन, 2. पोट भरण्यासाठी जेवण, 3. आराम करण्यासाठी शय्या (पलंग) आणि 4. तहान भागवण्यासाठी पाणी नसेल तर तेथे अतिथी रुपात कधीही थांबू नये.
1. आसन
एखादा पाहुणा घरात आल्यांनतर त्याला योग्य स्थानावर उदा, खुर्ची, सोफा, पलंग, चटई बसवावे. पाहुनायला योग्य आसनावर बसवनेच हा त्याचा सन्मान असतो. जर घरी आलेल्या पाहुण्याला मान-सन्मानाने योग्य स्थान दिले नाही तर त्याला अपमानित झाल्यासारखे वाटू शकते.
जेवण
घरी आलेल्या पाहुण्यांना खाऊ घातल्याने देवता प्रसन्न होतात, असे शास्त्रामध्ये वर्णीत आहे. ग्रंथांमध्येही सांगण्यात आले आहे की, ओळख नसलेला एकदा व्यक्तीही घरी आला तर काही तरी खायला दिल्याशिवाय जाऊ देऊ नये. वेळेवर जे काही उपलब्ध असेल ते अतिथीला प्रसन्न मनाने खाऊ घालावे. जर एखादा व्यक्ती घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण देण्यात असमर्थ असेल तर अशा व्यक्तीच्या घरी चुकूनही जाऊ नये. जर अशा व्यक्तीच्या घरी गेलातच तर तेथे थांबू नये.
शय्या म्हणजे पलंग
प्रत्येक व्यक्तीचा हाच प्रयत्न असतो की, घरी आलेल्या पाहुण्यांची पूर्ण काळजी घ्यावी. त्याच्या आरमामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये. जर एखादा पाहुणा जास्त दिवस थांबणार असेल तर त्याच्या झोपण्याची व्यवस्था केली जाते. घरामध्ये एकच पलंग असेल तर पाहुण्याला त्या पलंगावर झोपवले जाते आणि घरातील लोक खाली जमिनीवर झोपतात. परंतु तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीचा घरी पाहुणे म्हणून गेला असाल, ज्याच्याकडे पलंग किंवा झोपण्याची योग्य व्यवस्था नसेल तर तेथे जास्त वेळ थांबू नये. पाहुण्यांची योग्य व्यववस्था न ठेवता आल्यामुळे तो व्यक्ती दुःखी होऊ शकतो. यामुळे ज्या व्यक्तीकडे पाहुण्याला आराम देण्याची योग्य व्यवस्था नसेल तेथे जास्त वेळ थांबू नये.
पाणी
मनुस्मृतीनुसार ज्या व्यक्तीच्या घरामध्ये तहान भागवण्यासाठी पाणी नसेल तेथे अतिथी रुपात जास्त वेळ थांबू नये. घरी आलेल्या पाहुण्याला पाणी देऊन त्याचे स्वागत केले जाते. वर्तमान काळात पाणी एक बिकट समस्या आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा खूप उठाठेव करावी लागते. ज्या कुटुंबामध्ये ही अडचण असते त्यांच्या घरी पाहुणे आले तर त्यांना आणखी पाण्याची व्यवस्था करावी लागते. यामुळे त्या कुटुंबाची अडचण अधिक वाढू शकते. त्यामुळे अशा घरामध्ये जास्त काळ अतिथी रुपात थांबू नये.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.