आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Margashirsha Poornima: | On This Day, Taking Pilgrimage And Donating Gives The Merit Of Performing Many Sacrifices | Marathi News

मार्गशीर्ष पौर्णिमा:या दिवशी तीर्थस्नान व दान केल्याने मिळते अनेक यज्ञ केल्याचे पुण्य

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 8 डिसेंबरला असते. या दिवशी स्नान-दान, व्रत आणि भगवान श्रीविष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने अनेक यज्ञ करण्याइतके पुण्य मिळते असे पुराणात सांगितले आहे. या तिथीला भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांची केशव रूपात पूजा करावी. यासोबतच पूजेमध्ये शंखाने अभिषेक करावा. या दिवशी उपवास केल्याने आरोग्य सुधारते.

मार्शष पौर्णिमेचे महत्त्व
महिनाभर पूजा-पाठ आणि उपवास करणार्‍यांसाठी पौर्णिमेचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी तीर्थक्षेत्र किंवा पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापांचा नाश होतो. या दिवशी व्रत ठेऊन भगवान विष्णूची उपासना आणि कथा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला गीता पठणाचेही महत्त्व आहे. या दिवशी गीता पठण केल्याने पितर तृप्त होतात.

तुळशीच्या मातीने स्नान करण्याचे विधान
पुराणानुसार या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाच्या मुळाच्या मातीने पवित्र तलावात स्नान करण्याचे विधान आहे. असे केल्याने भगवान श्रीविष्णूची कृपा प्राप्त होते. स्नान करताना ऊं नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. यासोबतच भक्तीनुसार उपवास आणि दान करण्याचीही परंपरा आहे. यामुळे कळत-नकळत झालेल्या पापांचा आणि इतर दोषांचा अंत होतो.

मार्गशीर्ष पौर्णिमेची पूजा पद्धत
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. त्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून नमस्कार करावा. तुळशीचे पान तोडून भगवान श्रीविष्णूला अर्पण करावे. ताज्या कच्च्या दुधात गंगेचे पाणी मिसळून भगवान विष्णू-लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि शाळीग्रामचा अभिषेक करावा.

अबीर, गुलाल, अक्षत, चंदन, फुले, यज्ञोपवीत आणि इतर सुगंधी पूजेच्या साहित्याने परमेश्वराची पूजा करावी. भगवान सत्यनारायणाची कथा वाचून नैवेद्य दाखवावा आणि आरतीनंतर प्रसाद वाटावा.

बातम्या आणखी आहेत...