आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेडिटेशन:नकारात्मकता आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी बजरंगबलीसमोर बसून रोज करावे ध्यान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेडिटेशन करताना ऊँ शब्दाचा वारंवार उच्चार करावा

सध्या चालू असलेल्या नॅशनल लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना नकारात्मक विचारांचा सामना करावा लागत आहे. मानसिक तणावामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये दररोज सकाळी बजरंगबलीसमोर बसून ध्यान केल्यास लाभ होऊ शकतो. उज्जैनचे भागवत आणि श्रीराम कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमान पूजेने आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता, तणाव दूर होतो.

रोज सकाळी उठून ध्यान करावे

रोज सकाळी उठावे आणि थोडावेळ ध्यान करावे. मेडिटेशन करताना ऊँ शब्दाचा वारंवार उच्चार करावा. हा मंत्र उच्चार दीर्घ स्वरात करावा. दररोज हे काम केल्यास काही दिवसातच सकारत्मक फरक जाणवू लागेल. एकाग्रता वाढेल. 

देवाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून ध्यान करावे 

घरामध्ये हनुमान किंवा महादेव ध्यान स्थितीमध्ये असलेल्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून ध्यान करावे. दररोज हनुमान मूर्तीसमोर बसून हनुमान चालीसा पाठ करावा. असे केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि मन शांत होते. नकारात्मकता आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे 

रोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला एक तांब्याच्या कलशात पाणी घेऊन अर्घ्य द्यावे. ऊँ सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. मंत्र जप केल्याने मन शांत होते. यामुळे आरोग्य लाभासोबतच आत्मविश्वासही वाढतो. सूर्यदेवाला आत्मविश्वास कारक मानले जाते. यामुळे सूर्य पुजेनेही लाभ होतो.

बातम्या आणखी आहेत...