आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:चार वर्षांनंतर 12 मे रोजी वैशाख महिन्यात गुरुवार आणि एकादशीचा योग, या दिवशी व्रत-पूजेने मिळेल अक्षय पुण्य

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 मे रोजी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आणि गुरुवारचा योग जुळून येत आहे. असा शुभ योग चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोहिनी एकादशीला घडत आहे. यापूर्वी 26 एप्रिल 2018 रोजी असा योग जुळून आला होता. भगवान श्रीविष्णू हे वैशाख, एकादशी आणि गुरुवार या तिन्हींचे स्वामी आहेत. त्यामुळे या शुभ संयोगामध्ये व्रत आणि उपासना केल्याने कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते. आता असा योग पुन्हा 8 मे 2025 रोजी तयार होईल.

तीन शुभ योग
मोहिनी एकादशीला सूर्य आणि चंद्राच्या नक्षत्रांपासून रवियोग तयार होत आहे. यासोबतच उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे मातंग नावाचा शुभ योगही तयार होत असून हर्षन योगही जुळून येत आहे. या शुभ संयोगांमध्ये एकादशी व्रताचा योगायोग क्वचितच घडतो. या योगांमध्ये उपासना आणि व्रताचे शुभ परिणाम अधिक वाढतील. ज्यामुळे सुख-समृद्धी मिळेल. त्याचबरोबर या दिवशी जल दान केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.

मोहिनी स्वरूपाच्या पूजेचा दिवस
या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. श्रीविष्णूंनी मोहिनीचे रूप राक्षसांपासून अमृत वाचवण्यासाठी समुद्रमंथनात घेतले होते. या एकादशीला भगवान विष्णूची आराधना आणि उपवास केल्याने अनेक यज्ञ करण्याइतकेच पुण्य प्राप्त होते. यासोबतच कळत-नकळत झालेली पापेही संपतात.

हे व्रत त्रेता आणि द्वापर युगातही झाले
मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने कळत-नकळत केलेल्या सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. मोह आणि पापाचे बंधन संपते. माता सीतेचा शोध घेत असताना प्रभू श्रीरामांनीही हे व्रत केले होते. त्यांच्यानंतर मुनी कौण्डिन्य यांच्या आज्ञेनुसार धृष्टबुद्धी आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिर यांनीही हे व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावामुळे सर्वांना दुःख आणि संकटातून मुक्ती मिळाली.

बातम्या आणखी आहेत...