आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकादशीला काय करावे आणि काय करू नये:या व्रतामध्ये अन्न खाल्ले जात नाही, अन्न आणि जल दानाने मिळते कधीही न संपणारे पुण्य

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहिनी एकादशीला व्रत आणि दान करण्यासोबतच भगवान श्रीविष्णूंची विशेष पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने सर्वप्रकाराच्या अडचणी आणि कळत-नकळत केलेले पाप नष्ट होतात. या व्रतामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. ज्याचा शास्त्रात उल्लेख आहे. पद्म, स्कंद आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात एकादशीच्या व्रतामध्ये अन्न खाऊ नये असे सांगितले आहे. या व्रतामध्ये उपवासाचा नियम सांगण्यात आला आहे. ज्यामध्ये फक्त फळे खाऊ शकता.

का म्हटले जाते मोहिनी एकादशी
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, स्कंद पुराणातील वैष्णवखंडानुसार या दिवशी समुद्रमंथनातून अमृत निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला भगवान विष्णूंनी त्याच्या रक्षणासाठी मोहिनीचे रूप धारण केले. त्रयोदशीला भगवान विष्णूंनी देवतांना अमृत पाजले. यानंतर चतुर्दशीच्या तिथीला राक्षसांचा वध झाला आणि पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांना त्यांचे राज्य मिळाले.

एकादशीला काय करावे
1.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि आंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण करावे.
2. भगवान श्रीविष्णूसमोर व्रत आणि दानाचा संकल्प घ्यावा.
3. दिवसभर काहीही खाऊ नये. हे शक्य नसल्यास, फळ खाऊ शकता.
4. दिवसा मातीच्या भांड्यात पाणी भरून दान करा.
5. कोणत्याही मंदिरात अन्न किंवा धान्य दान करावे.
6. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीभोवती प्रदक्षिणा घालावी.
7. संध्याकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी.

काय करू नये
1.
या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी उशिरापर्यंत झोपू नये.
2. रागवू नका. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा.
3. लसूण-कांदा आणि इतर तामसिक गोष्टी टाळाव्यात.
4. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका आणि ब्रह्मचर्य पाळा.
5. व्यक्तीने प्रामाणिकपणे काम करावे आणि चुकीची कामे टाळावीत.

बातम्या आणखी आहेत...