आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी मोहिनी एकादशी:या दिवशी व्रत आणि भगवान श्रीविष्णूंची उपासना केल्याने मिळते अनेक यज्ञ करण्याइतके पुण्य

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. यावेळी 12 मे रोजी हे व्रत आहे. गुरुवार असल्याने या दिवशी भगवान श्रीविष्णूंची पूजा आणि व्रत केल्यास फळ द्विगुणित होते. पुराणानुसार हे व्रत केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात. या एकादशीचे दैवत श्री नारायण आहेत. नियमानुसार हे व्रत पाळल्यास सर्व प्रकारचे पाप आणि दोष नाहीसे होतात. या एकादशी व्रतामुळे यश आणि मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच मोहिनी एकादशीचे व्रत विशेष मानले जाते.

सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे गुरुवारची एकादशी
भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये सूर्य, यज्ञांमध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू आहेत, त्याचप्रमाणे एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. हे गुरुवारी असल्यास आणखीनच विशेष होते. जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो, तो मला खूप प्रिय आहे.

व्रत आणि पूजेचे पुण्य अनेक पटीने
मोहिनी एकादशी व्रताचे पूजनीय देवता भगवान विष्णू आहेत. शास्त्रानुसार जो एकादशी व्रत आणि रात्र जागरण करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याला अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होते. पूर्ण भक्तिभावाने पूजा केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीच्या व्रताने दु:ख आणि दोषही संपतात.

उपवास करू शकत नसाल तर...
आजारपणामुळे किंवा कोणत्याही कारणाने व्रत करू शकत नसाल तर भगवान विष्णूची पूजा अवश्य करावी. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच या तिथीला तांदूळ, लसूण, कांदा, मांस आणि तामसिक अन्न खाऊ नये. दारू आणि इतर सर्व मादक पदार्थांपासून दूर रहा.