आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी (4 डिसेंबर) मोक्षदा एकादशी आहे. याच दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या एकादशीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. रविवारी एकादशी असल्याने या दिवशी भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीकृष्ण तसेच सूर्यदेवाची पूजा करावी.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते ही एकादशी थंडीच्या दिवसांत येते. त्यामुळे या दिवशी गरजुंना लोकरीचे गरम कपडे आणि ब्लँकेट दान करावे. गोशाळेत धन आणि हिरवे गवत दान करावे.
अशा प्रकारे तुम्ही एकादशीचे व्रत करू शकता
एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठावे. स्नानानंतर भगवान श्रीविष्णूसमोर उपासनेचा संकलप घ्यावा. देवाची पूजा करून दिवसभर उपवास करावा. उपाशी राहणे शक्य नसल्यास फळे आणि फळांचे रस सेवन करू शकता. संध्याकाळीही भगवान श्रीविष्णूची पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेनंतर गरजूंना अन्नदान करावे. यानंतर स्वत: अन्न घ्यावे. अशा प्रकारे एकादशीचे व्रत पूर्ण होते.
हे शुभ कार्य देखील रविवारी केले जाऊ शकतात
एकादशीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना ऊँ सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. सूर्य पूजेसाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.
मंदिरात भगवान श्रीविष्णू तसेच महालक्ष्मीला अभिषेक करावा. श्रीकृष्णाच्या बालगोपाळ स्वरूपाचाही अभिषेक करावा. अभिषेकासाठी दक्षिणावर्ती शंख आणि केशर मिश्रित दुधाचा उपयोग करावा.
जे लोक व्रत करत नसतील त्यांनी भगवान विष्णूला केळी किंवा हंगामी फळे अर्पण करावीत. तुळशीला मिठाई अर्पण करा. ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा. सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावावा.
एकादशीला शिवलिंगावर चांदीच्या भांड्यात दूध आणि तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. शिवलिंगावर बिल्वपत्र आणि रुईची फुले अर्पण करावीत. ऊँ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. सूर्यास्तानंतर शिवलिंगाजवळही तुपाचा दिवा लावावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.