आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मोक्ष देणारे व्रत:आज भगवान श्रीविष्णू आणि श्रीकृष्णाची करावी केशव रूपात पूजा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी (4 डिसेंबर) मोक्षदा एकादशी व्रत आहे. याला मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी म्हणतात. या तिथीला भगवान विष्णूसोबत श्रीकृष्णाची पूजा करण्याचेही महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना असल्याने या दिवशी देवाची केशव रूपात पूजा करावी.

वर्षातील सर्व एकादशींपैकी मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी अतिशय विशेष आहे. कारण या दिवशी उपवास केल्याने मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच याला मोक्षदा एकादशी म्हणतात.

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याची जीवनात कळत-नकळत झालेल्या सर्व पापांपासून मुक्तता होते आणि पितरांनाही हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होते. म्हणूनच हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते.

मार्गशीर्ष मासाचे स्वामी आहेत श्रीकृष्ण
मार्गशीर्ष महिन्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत. या महिन्यात श्रीकृष्णाची पूजा करण्याविषयी पुराणात सांगितले आहे. त्याच वेळी द्वापार युगात पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या महाभारत युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी होता. त्यामुळे या व्रताचे महत्त्व आणखी वाढते. म्हणूनच या व्रतामध्ये श्रीविष्णूसोबतच श्रीकृष्ण पूजनाचे विशेष महत्त्व आहे.

या व्रतामध्ये काय करावे
1.
एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
2. उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. तुळशीला जल अर्पण करावे. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करावी.
3. पूजेमध्ये धूप, दिवा आणि नैवेद्य ठेवा. गरजू लोकांना दान करावे.
4. उपवासाच्या एक दिवस आधी दशमी तिथीला दुपारी एकदाच अन्न खावे. व्रताच्या दिवशी सात्विक आहार करावा.

एकादशी व्रतामागील कथा ही गोकुळच्या राजाची
गोकुळ नगरच्या राजाला आपले वडील नरकात असल्याचे स्वप्न पडले. त्यांनी पर्वत मुनींना सांगितले की त्यांचे वडील स्वप्नात नरकापासून मुक्ती मिळवण्याविषयी बोलत आहेत. मुनींनी राजाला मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून पित्याच्या उद्धारासाठी त्याचे पुण्य वडिलांना देण्यास सांगितले. राजाने आपल्या कुटुंबासह एकादशीचे व्रत पाळले आणि त्याचे पुण्य वडिलांना अर्पण केले. यातून त्यांना मुक्ती मिळाली आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणाले, तुझे कल्याण होवो. म्हणूनच या व्रताने पितरांना मोक्ष आणि स्वर्ग प्राप्त होतो असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...