आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्म:सोमवार आणि चतुर्थी योग, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अवश्य करावे हे व्रत

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीगणेश मंत्र ऊं गं गणपतयै नम: आणि शिव मंत्र ऊँ सांब सदाशिवाय नम: मंत्राचा जप करावा

सोमवार, 8 जूनला ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे. या महिन्यात सोमवारी चतुर्थी तिथी आल्यामुळे या दिवशी श्रीगणेशासोबतच महादेवाची विशेष पूजा करावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीचे महत्त्व अधिक आहे. चतुर्थी तिथीचे स्वामी श्रीगणेश आहेत. या दिवशी करण्यात आलेल्या व्रत-उपवासाने सुख-समृद्धी, ज्ञान आणि बुद्धीमध्ये वृद्धी होते.

पूजन विधी

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सोवळ्यात व्हा. सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना करावी. संकल्प मंत्रानंतर श्रीगणेशाची पंचोपचार पूजा करून आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला लाल फुल अवश्य अर्पण करावे. गणेश मंत्र (ऊं गं गणपतयै नम:) चा उच्चार करीत 21 दुर्वा अर्पण करा. प्रसादमध्ये मोदक अवश्य ठेवा. 

महादेवाचा मंत्र ऊँ सांब सदाशिवाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. बिल्वपत्र आणि फुल अर्पण करावे. दिवा लावून आरती करावी.

पूजा झाल्यानंतर घराजवळील गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावे. गायीला पोळी आणि हिरवा चारा खाऊ घालावा. एखाद्या गोशाळेत धन दानही करू शकता.

बातम्या आणखी आहेत...