आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, माणूस कर्म केल्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. कधी कधी आपले शरीर काही करत नाही, परंतु नेत्र हे इंद्रिय बरेच काही पाहण्याचे काम करते. हात काम करत राहतात. कान अनेक आवाज ऐकत राहतात. चला, आपण आपले डोळे, कान, जीभ बंद करूया आणि हातपाय हलवणे थांबवू. परंतु या सर्व इंद्रियांना प्रेरणा देणारे मन कर्ममुक्त कसे राहील? किती तरी विचार मनात मनात सुरू असतात! आपली काय काय कर्म करत राहते कळत नाही. आपले मन आणि अहंकारही काय काय ऊहापोह करत असते माहीत नाही. भगवान श्रीकृष्णाने काही सात्त्विक, राजसिक आणि तामसिक कर्मे सांगितली आहेत. ‘योग: कर्मसु कौशलम्|’ योगेश्वर श्रीकृष्णाचे भगवद्गीतेतील हे एक वाक्य. “सहजं कर्म कौन्तेय|” अर्जुना, तू उत्स्फूर्त कर्मे कर. सुलभ कार्य करत असतानाही त्यात काही त्रुटी राहिल्या तरी तू बांधला जाणार नाहीस. किती मोठे आश्वासन! उत्स्फूर्त कृती. श्वास चालतो तसे.
आता कर्माला योग कसे करायचे, यज्ञ कसे करायचे? आपले प्रत्येक कर्म यज्ञ व्हावे. ममता व अहंकार सोडून केलेले आपले प्रत्येक कर्म यज्ञ होते. ममता सोडणे म्हणजे हे माझ्यासाठी नाही, ‘न मम.’ समष्टीसाठी आहे. तुम्हाला माहिती आहेच, आपण यज्ञ करतो तेव्हा तूप टाकतो, जव टाकतो, मंत्र म्हणतो, पण यज्ञातून पवित्र ज्वाळा निघतात, तेव्हा त्या माझ्या नसतात. तो सर्वांचा प्रकाश होतो. ‘न मम.’ अहंकार आणि ममतेशिवाय केलेले प्रत्येक कर्म यज्ञ आहे.
दुसरे सूत्र, कोणाशी स्पर्धा करून कोणतेही कर्म करू नका, श्रद्धेने करा. विश्वासाने केलेले कर्म यज्ञ होते. एक घोडा स्पर्धेत जरा पुढे गेला. एका संघाने अधिक धावा केल्या, त्यांचा जयघोष झाला. ‘जय’ आणि ‘विजय’ वेगळे करून मला तुमच्याशी बोलायला आवडेल की, स्पर्धेतून केलेले कर्म जय देते, पण विजय देत नाही. विजय श्रद्धापूर्वक केलेली कर्मे देतो. यापेक्षा सोपे करून सांगायचे तर कर्म नीतीने करा. जे काही कराल ते नीती आणि प्रामाणिकपणे कराल तर तो यज्ञ होईल.
ही तीन सूत्रे लक्षात ठेवा. कर्म नीती, रीती आणि प्रीतीने करा. ज्या पद्धतीने करयाला हवे त्याच पद्धतीने कर्म करा. त्याची एक रीत असते, एक पद्धत असते, त्याच पद्धतीचा अवलंब करा. त्याची एक रेषा आहे; एक विवेकपूर्ण मर्यादा आहे. आणि कर्म प्रेमाने करा. शिक्षकाने शिकवण्याचे कर्म प्रेमाने करावे. शेतकऱ्याने प्रेमाने बियाणे पेरावे.
तिसरे म्हणजे, भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांचा आश्रय घ्या. ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचिन’ अर्जुना, तू त्यासाठी निमित्त आहेस. नियती करीलच. तू निमित्त हो. पळू नकोस, जागा हो. आपण निमित्त होऊन कर्म करू तेव्हा आपले कर्म यज्ञ होतील, मान झुकवून नाही. कोणत्याही दबावाखाली नाही. भगवंताने मला या कर्माचे निमित्त बनवले आहे, म्हणून मी निमित्त बनून हे कर्म केले पाहिजे. निमित्तमात्र होऊन केलेले कर्म यज्ञ आहे.
सूडबुद्धीने केलेले कोणतेही कर्म म्हणजे बंधन होय. बलिदानाच्या भावनेने केलेले कर्म यज्ञ आहे. बलिदान म्हणजे आपण सूड घेऊ नये. दक्षाने बदला घेण्यासाठी ‘मानस’मध्ये यज्ञ केला, कारण तो शिवावर नाराज होता. दक्षाचा यज्ञ कर्मयज्ञ झाला नाही. अयशस्वी झाला. या अध्यात्माच्या केवळ मोठमोठ्या गोष्टी नाहीत. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याच्या या गोष्टी आहेत.
मग आसक्तीपासून मुक्त होऊन कर्म करा. म्हणजे, मी करीनच, करत राहीनच, मला हे करायचेच आहे, असे आसक्त होऊ नका. झाले तर ठीक, नाही झाले तरी हरकत नाही. भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध विधान आहे ‘मा फलेषु कदाचन|’ तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही आणि फळ न मिळणारे कर्म कोण करील? यावर अनेक विचारवंतांनी चर्चा केली आहे. मी फक्त असे म्हणतो की, आपण फळासाठी कर्म करू नये, तर रसासाठी करावे. फळ मिळाले नाही तरी मी कर्म करीन, एवढेच. चांगले किंवा वाईट काहीही असो. वाईट फळ मिळाल्यास स्वत: भोगा. चांगले फळ मिळाल्यास ते वाटून टाका. ‘तेन त्यक्तेन भुंजिथा:|’ ही आपली औपनिषदीय विचारसरणी आहे.
मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.