आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक जीवन:या कठीण काळात सज्जन आणि बुद्धिवंत एकत्र येणे आवश्यकच

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरारी बापू, आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

श्री हनुमान लंकेत जाऊन सीतेच्या शोधासाठी सर्व ठिकाणी जातात. ती कुठेच मिळत नाही. मग बिभीषणाच्या अंगणात जातात आणि काही विशेष दृश्य पाहून त्याला वाटते की लंकेत एक सज्जन साधू पुरुष राहतोय. त्याची बिभीषणाची भेट होते. हनुमान त्याला विचारतो, मला सीतेकडे जाण्याचा उपाय सांग. बिभीषण उपाय सांगतात. आश्रमात राहून साधूचे जीवन जगणे सोपे आहे, पण बिभीषण जेथे राहतो, ती लंका कशी आहे?

लंका निसिचर निकट निवासा।

इहां कहां सज्जन कर बासा।।

चारीकडे मद्यपान, दहशत, धोका, भ्रष्टाचार. अशी स्थितीत एक माणूस ईश्वराची आराधना करतो. एक माणूस सज्जन होऊन राहतो. अशा जागी राहूनही देवाची पूजा करू शकतो आणि हनुमानाला उपाय सांगू शकतो, हे बिभीषणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तुलसीदास बिभीषणासाठी तीन शब्द योजतात. एक शब्द आहे ‘सज्जन’, दुसरा ‘साधू’ आणि तिसरा ‘संत.’ ही क्रमश: आंतरिक विकासाची भूमिका आहे. म्हणजे युक्ती सांगणारा साधू. तोच साधू आहे, तोच संत आहे. आणि अशा एखाद्या सिद्ध पुरुषाने युक्ती सांगितली तरच भक्तीपर्यंत पोहोचता येते. दुधात आणि अमृतात खूप फरक आहे. ही युक्ती अमृत आहे. बिभीषणाने हनुमानाला भक्ती-शांती-परमशक्ती यांच्यापर्यंत पोहोचण्याची युक्ती सांगितली.

एखाद्या सिद्ध पुरुषाकडून जीवन जगण्याची युक्ती जाणून घेतली तर जीवन सुंदर होते. आपणही असेच उपाय कोणाकडून जाणून घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी काही वस्तूंची गरज असेल. ‘रामायणा’त लिहिले आहे की, बिभीषण जेव्हा रामाजवळ जातो तेव्हा आपल्या मंत्र्यांनाही घेऊन जातो. कोणत्या मंत्र्यांना घेऊन गेला होतो, त्याबाबत काही लिहिले नाही. पण बिभीषण ज्या मंत्र्यांना सोबत घेऊन गेले अशा मंत्र्यांचा शोध मी घेतला आहे. त्यांची संगत मिळाली तर आपणही ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो.

एका मंत्र्याचे नाव तर ‘रामायणा’त आहे, सुमंत. दशरथाचा मंत्री सुमंत. सुमंत सारथीही आहे आणि मंत्रीही. सुमंतरूपी मंत्री आपल्याला भेटले तर आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. सुमंत म्हणजे एखादा कल्याणकारी मंत्र, बुद्धिवंत भेटला तर तो खूप मोठा मंत्री आहे. दुसरा आहे वैराग्यरूपी मंत्री. त्याग करण्याची वेळ आल्यावर पुढाकार घेणे. वैराग्यरूपी मंत्री आपल्याला रामापर्यंत पोहोचवतो. तिसरा मंत्री शास्त्र. तुम्ही ज्या धर्माचे अनुयायी आहात, त्याच्या देवाचे शास्त्र. पैगंबर साहेबांचे शास्त्र आहे. शीख बांधवांचे तसेच जैन बांधवांचे स्वत:चे शास्त्र आहे. हिंदूंकडे वेद आहेत. ‘रामचरितमानसा’चे ज्ञान आहे. आपला शास्त्ररूपी एक मंत्री आपल्याकडे असावा. त्याचे मार्गदर्शन आवश्यक आहे. सध्या संपूर्ण जगात जेवढी शांतता आहे, तेवढी कधीच नव्हती, असे वैज्ञानिकांचे आणि बुद्धिवंतांचे मत आहे. ते आध्यात्मिक गुरू नाहीत, वैज्ञानिक आहेत. पण तरीही त्यांचा अंदाज चांगला आहे. तरीही आपण असे म्हणू शकतो की, आजकाल अशांतता तर खूप आहे आणि दिसतेही आहे. ते दिसते त्याचे कारण एकच, ते म्हणजे सध्या आपल्याकडे माहिती देणारी साधने एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की, एक लहान घटना घडली तरी ती सेकंदात संपूर्ण जगात पसरते. आणि ती गोष्ट सतत फिरते, त्यामुळे आपल्याला सगळे काही शांत वाटते. आधीच्या युगाबाबत विचार केल्यास मला वाटते की आधी दोन समाज लढत होते. दोन समाजात संपूर्ण जग विभागले होते. देव आणि दानव, सुर आणि असुर, सत्ययुगापासून हे दोन समाज सतत लढतच राहिले! त्यानंतर दोन कुुटुंबात लढाई झाली. कौरव आणि पांडवांच्या युद्धात पूर्ण कुटुंबाचा विनाश झाला. ‘रामायण’ काळात पाहिले तर लंका आणि अयोध्येत लढाई झाली. आज-काल दोन समाजांत नव्हे तर व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष आहे. तो आपल्यापुढे गेला हा. अशा विषम काळात जीवनाला आकार द्यायचा असेल तर एखाद्या बुद्धिजीवी व्यक्तीकडूनच युक्ती प्राप्त करून घ्यायला हवी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser