आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:आपली तीन संकटे आणि त्यावर मात करण्याचे मार्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटे तीन प्रकारची असतात. प्राणसंकट, विश्वसंकट आणि धर्मसंकट. या तिघांवर मात करण्याची क्षमता आपल्यात आहे...

संकटे अनेक प्रकारची असतात. कधी कधी आपण संकटाला आपत्ती म्हणतो, कधी वेदना, कधी त्रास, तर कधी दु:ख. आपण आपल्या अनुभवाच्या आधारावर संकटांचे बरेच वर्गीकरण करू शकतो. कधी व्यक्तीवर प्राणसंकट येते, कधी कौटुंबिक संकट, कधी सामाजिक किंवा कधीकधी राष्ट्रीय आणि जागतिक संकट येऊ शकते. आज देश आणि जगावर कोरोनाचे भयंकर संकट आहे. या वातावरणात मी तीन संकटांबद्दल सांगेन.

‘हनुमान चालीसा’ मध्ये तीन वेळा ‘संकट’ शब्द वापरला गेला आहे.
संकट से हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जाे लावै।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जाे सुमिरै हनुमंत बल बीरा।।
पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप।

आजच्या संदर्भात संकटे तीन प्रकारची आहेत. पहिले प्राणसंकट, जे संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवत आहे. किती देशांमध्ये मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत! भारतातही आपण रोज आकडेवारी वाचतो. या आपत्तीच्या काळात मानवी शरीरातील पंचप्राण असंतुलित झाले आहेत. केव्हा काय होईल? दुसरे म्हणजे ‘राष्ट्रसंकट’ किंवा सीमांच्या पलीकडे गेल्यास ‘विश्वसंकट’. आज प्राणसंकटही आहे आणि देश व जगावरही संकट आहे. तिसरे आहे धर्मसंकट आहे. व्यवहारात आपण बऱ्याचदा म्हणतो की, आमच्यावर धर्मसंकट आले होते त्यामुळे असे करावे लागले. धर्मसंकटाचा अर्थ असा आहे की जो सत्यमार्गी, प्रेममार्गी आहे त्याच्यावर संकट. दयाळू असलेल्यावर संकट.

प्राणसंकट, राष्ट्र किंवा विश्वसंकट आणि धर्मसंकट. आत्मज्ञानी लोकांची वाणी त्यांच्या अंत:करणातील प्रवृत्तीमुळे खूप आधीच काही गोष्टी सांगते. म्हणूनच गोस्वामीजींनी ‘संकट’ हा शब्द बहुधा तीनदा वापरला. चला, तीन प्रकारची संकटे आहेत, परंतु त्यापासून मुक्त होण्यासाठी रडत राहायचे का? निराश व्हायचे? त्यामुळे संकटातून मुक्ती मिळेल का?

उदाहरणार्थ, हरणाला शिकाऱ्याने बाण मारल्यास हा बाण कोठून आला याबद्दल नंतर विचार केला पाहिजे. तो किती मोठा होता, कुणी, का, केव्हा मारला कधी? या गोष्टींचा नंतर विचार केला जातो. त्या वेळी केवळ पशूच्या शरीरातून बाण कसा काढायचा, याचा विचार केला पाहिजे. तर मग आपण सर्वांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे की प्राणसंकट, धर्मसंकट आणि राष्ट्रसंकटातून कसे बाहेर पडायचे? त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. ते भौतिक उपाय असू शकतात, त्यांना आधिभौतिक म्हणतात. संपूर्ण देश या उपायात व्यग्र आहे की हे करा, ते करा. जे सत्य आहे, त्याला आधिदैविक म्हणतात. कुणी अनुष्ठानाला बसले आहे, कुणी यज्ञ करत आहे, कुणी नामस्मरणात दंग झाले आहे. हेदेखील उपाय आहेत. आणि काही आध्यात्मिक उपायही आहेत.

‘हनुमान चालीसा’तील संकट शब्द असलेल्या ओळींकडे मी लक्ष वेधून घेऊ इच्छितो. हाही आध्यात्मिक उपाय आहे. ‘संकट से हनुमान छुडावै’. इथे ‘हनुमान’ शब्द येतो, तो कोणत्या धर्माचा वा परंपरेचा आहे? नाही. मी पुन्हा पुन्हा म्हणालो, हनुमान वायुपुत्र आहे, प्राणतत्त्व आहे, म्हणूनच प्रत्येकाचा आहे. दुसऱ्यांदा ‘संकट’ शब्द आला तेव्हा तिथे लिहिले आहे की, जो हनुमंताचे स्मरण करील त्याचे सर्व दुःख दूर होईल. साधक, बंधू-भगिनींनो, ज्याचे ध्यान कराल त्याचेच स्मरण करा आणि ज्याचे स्मरण कराल त्यालाच हृदयात ठेवा. त्याचे केंद्र हनुमान असावे. सार्वभौम, सर्वव्यापक तत्त्व असावे. तिथे हनुमान संकटापासून मुक्त करील. मन, कर्म व शब्दांनी त्याचे ध्यान करा. तुम्ही हनुमानाचे ध्यान करू शकत नसाल तर ‘जो सुमिरै हनुमंत बलबीरा’. त्याचे स्मरण केल्यामुळे तो माझे इच्छित पूर्ण करण्यास समर्थ आहे. हा दुसरा उपाय आहे. तिसरा, राम, लक्ष्मण, जानकीसह हनुमानाला हृदयात विराजमान करा. ही एक संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया आहे. चला, आपण प्राणसंकट, धर्मसंकट, विश्वसंकटावर मात करण्यासाठी त्याच तत्त्वाचे ध्यान करूया व त्यालाच हृदयात विराजमान करूया.

मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

बातम्या आणखी आहेत...