आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक कथा:वारंवार अपयश पदरी पडत असेल तर धैर्य बाळगावे, कधी-कधी यश थोड्या उशिराने प्राप्त होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक तरूण मुलगा आयुष्यात संघर्ष करून खूप थकला होता, त्याला पैसे कमण्याचा कोणताच मार्ग सापडत नव्हता. म्हणून तो खूप निराश झाला आणि आत्महत्या करण्यासाठी जंगलात गेला. तेथे त्याला एक संत भेटले. संताने त्याला विचारले की, तू एकटा जंगलात काय करत आहेस?

तरूणाने आपली सर्व समस्या संताना सांगितली. यावर संत म्हणाले तूला काम नक्कीच मिळेल. तू निराश होऊ नको. तरूण गुरूंना म्हणाला की मी हिम्मत हारलो आहे. मी आता काही करू शकत नाही. संत तरूणाला म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो, यामुळे तूझी निराशा दुर होईल.

तर गोष्ट अशी आहे, एका लहान मुलाने एक बांबूचे आणि निवडूंगाचे झाड लावले. तो लहान मुलगा रोज दोन्ही झाडांची देखरेख करायचा. एक वर्ष असेच निघून गेले. निवडुंगाचे झाड टवटवीत दिसू लागले, पण बांबूचे झाड जसे होते तसेच राहिले. तो मुलगा निराश झाला नाही आणि दोन्ही झाडांची देखरेख करत राहिला. असेच काही महिने निघून गेले, तरी काही बांबूचे झाड वाढत नव्हते. तो मुलगा तरीही निराश झाला नाही, त्याने झाडांची निगा राखने सुरूच ठेवले.

काही महिन्यांनंतर बांबूचे झाड टवटवीत दिसू लागले आणि काही दिवसातच निवडुगांच्या झाडापेक्षाही मोठे झाले. म्हणजे, बांबूचे झाड आधी आपले मुळ मजबुत करत होते, म्हणून त्याला वाढायला थोडा वेळ लागला. संत तरूणाला म्हणाले, आपल्या आयुष्यात जर संघर्ष करायची वेळ आली तर आपण त्याचा सामना करायला पाहिजे. जसा आपला पाया अधिक मजबूत होईल, आपण तेवढ्याच वेगाने यशाच्या शिखरापर्यंत जाऊ. तोपर्यंत धैर्य ठेवणे गरजेचे आहे. तरूणाला संतांची गोष्ट समजली आणि त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला.