आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण:आपल्या वर्तमानाचे महत्त्व समजून न घेता भूतकाळात अडकून पडल्याने नुकसानच होते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्तमानाचे महत्त्व समजणे गरजेचे

एकदा एक राजा जंगलात शिकारीसाठी गेला. त्याला परतण्याला उशीर झाल्यामुळे तो जंगलातील एका लाकूडतोड्याच्या झोपडीत थांबला. तो लाकूडतोड्या जंगलातून लाकडे आणून त्यांचा कोळसा बनवून विकत असे. लाकूडतोड्याने विचार केला की, राजाच्या पाहुणचारात काही उणीव राहू नये. सकाळी राजाने पाहुणचाराने खुश होऊन लाकूडतोड्याला चंदनाची एक बाग भेट म्हणून दिली. सवयीनुसार लाकूडतोड्या चंदनाची लाकडे तोडून त्यांचा कोळसा बनवून बाजारात विकू लागला. अनेक वर्षे असे झाल्यावर बागेत चंदनाची थोडीशीच झाडे उरली.

एक दिवस पावसामुळे लाकूडतोड्या कोळसा बनवू शकला नाही व चंदनाची लाकडेच बाजारात विकायला घेऊन गेला. सुवासामुळे त्याच्याकडे अनेक ग्राहक येऊ लागले आणि एकेका फांदीसाठी त्याला १० पट किंमत द्यायला तयार झाले. लोकांनी ते चंदन असल्याचे सांगितल्यावर त्याला सवय आणि अज्ञानामुळे आपण स्वत:चे किती नुकसान केले, याची जाणीव झाली.

बातम्या आणखी आहेत...