आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक कथा:अहंकारामुळे आलेली मदतही दिसत नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावात एक पुजारी स्वत:ला देवाचा मोठा भक्त मानत होता. त्याला आपल्या भक्तीचा अहंकार होता. एकदा गावात पूर येतो. गावकरी गावाबाहेर जाऊ लागतात. लोक पुरात अडकलेल्या पुजाऱ्याला सांगतात, आमच्यासोबत चला. पुजारी म्हणतात, ‘तुम्ही पुढे व्हा, देवावर माझा विश्वास आहे, तो मला वाचवायला येईल.’ पाणी कमरेपर्यंत येते तेव्हा एक जीप येते. जीपमध्ये बसलेले लोक पुजाऱ्याला बोलावतात तेव्हा पुजारी म्हणतात, ‘देव मला वाचवायला येईल.’ मग पाणी खांद्यापर्यंत वाढते. तेव्हा एक नाव येते. पुजारी पुन्हा तसेच म्हणतात.

काही वेळानंतर हेलिकॉप्टर येते. बचावकर्ते पुजाऱ्याला बोलावतात. पुजारी पुन्हा म्हणतात, ‘देव माझ्या मदतीसाठी येईल.’ शेवटी पुजारी बुडतो आणि देवाघरी पोहोचतो. देवाला ते रडत म्हणतात, ‘मी तुझा इतका मोठा भक्त होतो, मग माझ्या मदतीसाठी तू का आला नाहीस?’ देव म्हणाला, ‘मी तीन वेळा तुला वाचवण्याचा प्रयत्न केला. आधी जीप, मग नाव आणि मग हेलिकॉप्टर पाठवले. पण तुला स्वत:लाच बाहेर यायचे नव्हते.’

तात्पर्य : अनेक वेळा अहंकारामुळे समोर असलेली मदत वा उपायाकडे व्यक्तीचे लक्ष जात नाही.

बातम्या आणखी आहेत...