आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरक कथा:कधी कधी उपाय सोपा असतो, परंतु जास्त विचार केल्यामुळे आपण त्याकडे लक्ष देत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका माणसाने जगातील कोणतेही कुलूप उघडण्यात प्रभुत्व मिळवले होते. कुलूप कितीही जटिल असले तरी तो ते उघडायचा. त्याचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी लोकांनी एक कार्यक्रम आयोजित केला. त्यात त्याला चेंबरमध्ये बंद करून चेंबर पाण्यात टाकण्यात आले. चेंबरच्या दरवाजाचे कुलूप उघडून त्या माणसाला बाहेर येण्याचे आव्हान देण्यात आले, ते त्याने स्वीकारले. चेंबरमध्ये आणीबाणीचा गजरही होता. कुलूप उघडू शकला नाही तर तो गजर वाजवू शकत होता.

खेळ सुरू झाला. त्याने एक तार बाहेर काढली आणि ती कुलपात घालू लागला. पण या वेळी त्याला जास्त वेळ लागत होता. हळूहळू तो गुदमरायला लागला, पण कुलूप उघडले नाही. पराभव स्वीकारून त्याने गजर वाजवला. चेंबर पाण्यातून काढताना निराश होऊन तो दाराला खेटून बसला होता. चेंबर बाहेर येताच दरवाजा आपोआप उघडला. मग त्याच्या लक्षात आले, चेंबर कुलूपबंद केलेच नव्हते, परंतु त्याने एकदाही विचार केला नाही की, कुलूप उघडलेलेही असू शकते.

तात्पर्य : कधी कधी उपाय सोपा असतो, परंतु जास्त विचार केल्यामुळे आपण त्याकडे लक्ष देत नाही.

बातम्या आणखी आहेत...