आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोधकथा:जीवनात वादळे येत राहतात त्यासाठी आपली तयारी पूर्ण असणे आवश्यक

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. शेतात काम करण्यासाठी त्याला मजुरांची गरज होती. परंतु जिथे सतत वादळे येत असतात अशा धोकादायक ठिकाणी कोणीही काम करण्यास तयार होत नाही. एकेदिवशी सामान्य उंचीचा एक म्हातारा माणूस त्या शेतकऱ्याकडे गेला. शेतकऱ्याने त्याला विचारले, ‘तुम्ही या परिस्थितीत काम करू शकाल?’ वृद्ध हसला आणि म्हणाला, ‘का नाही? फक्त वादळ आले की मी झोपतो.’ त्या शेतकऱ्याला हे उत्तर विचित्र वाटले, परंतु त्याला इतर मजूर मिळत नव्हते म्हणून त्याने त्या म्हाताऱ्याला कामावर घेतले. तो कामगार म्हातारा होता, पण मेहनती होता. दिवसभर शेतात काम करायचा. त्यामुळे शेतकरी खुश होता. 

एके रात्री वादळ आले. वारा जोरात वाहू लागला. शेतकरी कंदील उचलून मजुराच्या झोपडीकडे गेला. तो ओरडला, ‘लवकर उठ, वादळ आले आहे, दिसत नाही का? प्राण्यांना गोठ्यात बांध. कापणी केलेले पीक कोठारात ठेव. गोठ्याच्या दरवाजाला दोरीने बांध.’ कामगार त्याच्याकडे वळला आणि म्हणाला, ‘मी म्हणालो होतो ना, वादळ आले की मी झोपतो...’ असे बोलून तो पुन्हा झोपी गेला. शेतकऱ्याला इतका राग आला की त्याला गोळी घालावी, असे वाटले. परंतु, आपले पीक वाचवण्यासाठी त्याने शेतात धाव घेतली. शेतकरी शेतात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की पीक कापून कोठारात ठेवलेले होते. प्राणी गोठ्यात होते. गायी व बैल सर्व पशू सुरक्षित होते. आता त्याला मजूर काय म्हणाला ते कळले, वादळ आले की मी झोपतो...

शिकवण  - आपल्या जीवनात अशीच वादळे येतात. त्यासाठी आपली तयारी हवी. मग आपणही म्हणू शकतो : जेव्हा वादळ येते तेव्हा आम्ही झोपी जातो.

- रायझिंग होप, मीडियाकडून साभार

बातम्या आणखी आहेत...