आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकदा अकबर-बिरबल जंगलात शिकारीला गेले. तेथे अकबराच्या अंगठ्याला दुखापत झाली. हे पाहून बिरबल हसत म्हणाला, ‘महाराज, होते ते चांगल्यासाठीच.’ हे ऐकून अकबर संतापला आणि त्याने सैनिकांना आदेश दिला की, बिरबलाला रस्ताभर चाबूक मारत घेऊन जा व उद्या सकाळी त्याला फाशी द्या.
अकबर नंतर एकटा शिकारीला लागला. तेथे त्याला आदिवासींनी पकडले आणि बळी देण्यासाठी नेले. अकबराला बळी देताना एक आदिवासी किंचाळला, ‘याच्या अंगठ्याला जखम आहे. हा अपवित्र आहे. त्याला सोडून द्या.’ आता अकबर दु:खी झाला. त्याने विचार केला, आपण विनाकारण बिरबलाला फाशी सुनावली. त्याने धावत जाऊन फाशी थांबवली. मग बिरबलाची माफी मागितली. यावर बिरबल म्हणाला, “महाराज, जे घडते ते चांगल्यासाठीच.” चकित अकबर विचारतो, “चाबकाचे फटके खाण्यात काय चांगले आहे?’ बिरबल उत्तर देतो, ‘महाराज, मी तुमच्याबरोबर असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता.’
तात्पर्य : आपल्याला संकट वाटते, हा दृष्टिकोन ही आपली खरी समस्या आहे. यातही चांगले शोधले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.