आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरक कथा:जोपर्यंत यश प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबू नये

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष्य निश्चित करतो

तोच व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो, जो कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबत नाही. या संदर्भात एक लोककथा प्रचलित आहे. कथेनुसार, प्राचीन काळी एका राजाला अपत्य नव्हते आणि तो खुप वृद्ध झाला होता. त्याला राज्याची आणि नवीन उत्तराधिकाऱ्याची चिंता सतावू लागली. एक दिवशी त्याने घोषणा केली की, जो व्यक्ती उद्या संध्याकाळपर्यंत त्याला एका ठरलेल्या वेळेवर येऊन भेटेल त्याला तो त्याचा राज्याचा उत्तराधिकारी बनवेल. हे ऐकून राजाचे मंत्री म्हणाले की, महाराज हे तर अगदी सोपे काम आहे, या घोषणेमुळे संपूर्ण प्रजाच राजा बनण्यासाठी पोहोचेल. राजाने सांगिलते असे काहीही होणार नाही, तुम्ही मी सांगतो तसे करा, बघू माझ्यापर्यंत कोण पोहोचते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजाने त्याच्या माहालात एका जत्रेचे आयोजन केले. त्यात नाच गाण्यासोबतच खाण्या पिण्याची उत्तम व्यवस्था केली होती. त्यात हजारो लोक आले होते. काही लोक खाण्या पिण्यात व्यस्त होते तर काही नाच गाण्यात. कोणालाच राजाला भेटायचे लक्षात आले नाही.

या सर्वामध्ये एक तरूण आला होता. त्याचे लक्ष फक्त राजाला भेटण्याकडेच होते. त्यामुळे त्याने खाण्या-पिण्यात किंवा नाच-गाण्याकडे लक्ष दिले नाही. ठरलेल्या वेळत तो राजाला भेटायला गेला. पण दाराबाहेर त्याला राजाच्या सैनिकांनी अडवले. पण त्यांना धक्का देऊन तो राजाकडे गेला. तेव्हा राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला की, तु एकमात्र व्यक्ती आहेस जो कोणत्याही प्रलोभनामध्ये न अडकता आणि कोणालाही न घाबरता मला भेटायला आला आहेस. त्यामुळे मी तुला माझ्या राज्याचा उत्तराधिकारी बनवत आहे.

लाइफ मॅनेजमेंट - यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष्य निश्चित करतो आणि त्यावर ठाम राहून आपल्या लक्ष्याकडे जाणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करून आपले ध्येय साध्य करतो.

बातम्या आणखी आहेत...