आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपूजेच्या विशेष गोष्टी:शिवलिंगावर अनेक दिवस अर्पण करू शकता एकच बिल्वपत्र, शमीचे पानही अर्पण करावे

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना बेलाची पाने अवश्य अर्पण करावीत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून बेलाची पाने सहज उपलब्ध होतात परंतु बेलाची पाने उपलब्ध नसल्यास शिवलिंगावर ठेवलेली बेलाची पाने धुऊन पुन्हा देवाला अर्पण केली जाऊ शकतात.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, बेलाची पाने अनेक दिवस शिळी मानली जात नाहीत. शिवपुराणात असे लिहिले आहे की, एकच बिल्वपत्र पुन्हा पुन्हा धुवून पूजेत वापरता येते. शिवलिंगावर बेलाच्या पानांसोबत शमीची पानेही अर्पण करावीत. शनिदेव, श्रीगणेश आणि महादेवाला शमीची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे.

बेलाच्या पानांशिवाय शिवपूजा अपूर्ण राहते
शिवपूजेमध्ये बेलाची पाने अनिवार्यपणे असावीत. या पानांशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते. लक्षात ठेवा की, अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या तिथी आणि रविवारी बेलाची पाने तोडू नयेत. या तिथींना बाजारातून विकत घेऊन किंवा शिवलिंगावर अर्पण केलेली बेलाची पाने धुवून पुन्हा भगवंताला अर्पण करू शकता.

बेलाचे झाड घरातही लावू शकता
सध्या पावसाळा सुरु आहे आणि या दिवसात लावलेल्या झाडांची भरभराट होण्याची क्षमता जास्त राहते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात बेलाचे रोप लावू शकता. जर बिल्वपत्राचे झाड घराच्या बाहेर किंवा आजूबाजूला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात. आयुर्वेदानुसार बिल्व वृक्षाचे फळ अत्यंत पौष्टिक असून त्याचे नियमित सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. हे फळ अनेक औषधांमध्ये वापरले जाते.

बेलाच्या झाडामध्ये देवी-देवतांचा वास
बेलाचे झाड हे शिव रूप मानले जाते. याला श्रीवृक्ष असेही म्हणतात. हे श्रीमहालक्ष्मीचे एक नाव आहे. या झाडाच्या मुळांमध्ये देवी गिरिजा, देठात देवी माहेश्वरी, फांद्यांमध्ये देवी दक्षिणायनी, पानात पार्वती, फुलांमध्ये गौरी आणि फळांमध्ये देवी कात्यायनी वास करते. पानात पार्वतीचा वास असल्यामुळे शिवलिंगावर विशेष अर्पण केले जाते.

बातम्या आणखी आहेत...