आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पौर्णिमेशी संबंधित मान्यता:आश्विन महिन्यातील पौर्णिमेलाच सोमरस बनत असे, या रात्री रावण चंद्राची किरणे आपल्या नाभीवर घेत असे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद ऋतूतील पौर्णिमेचे वर्णन ग्रंथांमध्ये विशेष असे केले आहे. या तिथीला चंद्रा प्रकाशात औषधी गुणधर्म येतात. त्यामुळे या रात्री चंद्रप्रकाशात खीर ठेवून प्रसाद म्हणून खाण्याची परंपरा आहे. यावेळी हा सण रविवार, 9 ऑक्टोबर रोजी आहे.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ.गणेश मिश्र यांच्यानुसार, पौर्णिमा तिथी रविवारी संपूर्ण दिवस-रात्र राहील. त्यामुळे सकाळी पवित्र स्नान करून दान करणे शुभ राहील. दिवसभर व्रत आणि उपासना केल्यानंतर संध्याकाळी चंद्र दर्शन करावे. नंतर प्रार्थना करावी. सर्व देवतांना खिरीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवा आणि प्रसाद म्हणून घ्या.

शरद पौर्णिमेला दीपदान करण्याची परंपरा
या सणाला दीपदान करण्याचीही परंपरा आहे. रात्री तुपाचे दिवे लावून मंदिर, घराच्या अंगणात ठेवा. तसेच तुळशी आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. असे केल्याने कळत-नकळत केलेल्या पापांचा दोष कमी होतो.

शरद पौर्णिमेच्या दिवशी ऐरावतावर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारची सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी उपवासही करावा आणि काशाच्या भांड्यात तूप भरून दान केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.

मान्यता : शरद पौर्णिमेलाच बनवला जात होता सोमरस
शरद पौर्णिमेला औषधांची शक्ती आणखी वाढते. असे मानले जाते की, या रात्री चंद्राच्या प्रकाशात सोमलता नावाच्या औषधाचा अर्क काढून त्याचा रस तयार केला जात असे, त्याला सोमरस म्हणतात. हा रस देवता सेवन करत होते. त्यामुळे अमृत तत्व आणि देवांची शक्ती वाढत होती.

शरद पौर्णिमेच्या रात्री लंकापती रावण आपल्या नाभीत चंद्राची किरणे ग्रहण करत असे. असे केल्याने त्याला पुनर्योवन शक्ती प्राप्त होत होती. म्हणजेच त्याची ताकद आणखी वाढायची.

बातम्या आणखी आहेत...