आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुद्राक्षाशी संबंधित मान्यता:महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्ष, जाणून घ्या कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष धारण करू नये

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवाला आराध्य मानणारे अनेक लोक रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष हातात ब्रेसलेट म्हणून किंवा गळ्यात हार स्वरूपात घातला जातो. रुद्राक्ष हे शिवाचे प्रतिक मानले जाते. असे मानले जाते की, जे रुद्राक्ष धारण करतात त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि ते वाईट काळ, नकारात्मक विचारांपासून दूर राहतात. लक्षात ठेवा, कधीही तुटलेला किंवा खराब झालेला रुद्राक्ष धारण करू नये.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, महादेवांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली आहे. असे म्हणतात की, एकदा शिव ध्यानस्थ बसले होते. ध्यानाच्या मुद्रेतच शिवाच्या डोळ्यातून अश्रू आले. हे अश्रू पृथ्वीवर पडताच तेथे रुद्राक्षाची झाडे निर्माण झाली. या आख्यायिकेमुळे रुद्राक्ष हे शिवाचे प्रतीक मानले जाते.

रुद्राक्षाशी संबंधित खास गोष्टी
रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. रुद्राक्षाची श्रेणी 1 मुखी ते 14 मुखी आहे. प्रत्येक रुद्राक्षाचे महत्त्व वेगळे असते. वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळे रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला विद्वान देतात.

आकारानुसार रुद्राक्षाचे 3 प्रकार आहेत. रुद्राक्षाचा पहिला आकार आवळ्यासारखा असतो. दुसरा प्रकार बोराच्या आकाराचा रुद्राक्ष आणि तिसरा प्रकार हरभऱ्याच्या दाण्याएवढ्या आकाराचा रुद्राक्ष. भाविक त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवडीचा रुद्राक्ष धारण करतात.

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी या नियमांचे पालन करावे
रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी मांसाहार टाळावा. घरात अस्वच्छता असू नये. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. देवाचा किंवा देवाच्या प्रसादाचा कधीही अनादर करू नका. कुटुंबातील आणि समाजातील सर्व ज्येष्ठांचा आदर करा. आई-वडिलांची सेवा करा. मादक पदार्थांपासून दूर राहा. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. रुद्राक्ष धारण करून या गोष्टींची काळजी न घेतल्यास रुद्राक्षाचे शुभ परिणाम मिळत नाहीत.

कोणते रुद्राक्ष धारण करू नये
काही रुद्राक्ष किड्यांमुळे खराब होतात, काही तुटतात, खंडित होतात. काही वेळा रुद्राक्षात चुकीची छिद्रेही पडतात, असे रुद्राक्ष धारण करू नयेत.

असा रुद्राक्ष धारण करावा जो पूर्ण गोलाकार असेल, ज्यामध्ये दाणे स्पष्ट दिसत असतील, ज्या रुद्राक्षात दोरा ओवण्यासाठी छिद्र नैसर्गिकरीत्या बनलेले असेल, तो रुद्राक्ष धारण करावा.

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी शिवलिंगासोबत रुद्राक्षाचाही अभिषेक करून पूजा करावी. रुद्राक्ष धारण केल्यानंतर शुद्धतेची गंभीरपणे काळजी घ्या.

बातम्या आणखी आहेत...