आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपंचमी मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी आहे. या तिथीला महादेवासोबतच नागदेवाची पूजा केली जाते. हा सण सापांना समर्पित आहे. शास्त्रात नागांबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत. राजा परीक्षित यांच्याशी संबंधित एक कथा आहे.
महाभारतात जेव्हा अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित याला समजले की पुढील सात दिवसांनी तक्षक या नागाच्या दंशामुळे त्याचा मृत्यू होणार आहे, तेव्हा परीक्षितने या सात दिवसांत शुकदेवजींकडून श्रीमद भागवत कथा ऐकली होती. सातव्या दिवशी तक्षक सापाने दंश केल्याने राजा परीक्षितचा मृत्यू झाला. परीक्षितानंतर त्याचा पुत्र जन्मेजय राजा झाला.
राजा जन्म्येजयला जेव्हा कळले की, आपले वडील परीक्षित हे तक्षक या नागाच्या दंशामुळे मरण पावले आहेत, तेव्हा त्याला खूप राग आला. राजा जन्म्येजयने नागांचा सूड घेण्यासाठी नागदह यज्ञ सुरू केला.
यज्ञ सुरू झाल्यानंतर पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून साप यज्ञकुंडात येऊन पडू लागले. ऋषी-मुनी नागांच्या नावाने यज्ञ करत होते आणि नाग यज्ञात येऊन पडत होते. या यज्ञाला घाबरून तक्षक नाग देवराज इंद्राजवळ जाऊन लपला.
त्यावेळेस आस्तिक ऋषींना यज्ञाची माहिती मिळाली, त्यानंतर ते यज्ञस्थळी पोहोचले. राजा जन्म्येजयला सर्व ऋषीमुनींचा खूप आदर होता, त्यांनी आस्तिक ऋषींना नमन केले. आस्तिक ऋषींनी राजाला नागदह यज्ञ थांबवण्यास समजावून सांगितल्यावर राजा जन्मेजयने यज्ञ थांबवला आणि नाग पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.