आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी 2 ऑगस्टला:या दिवशी नऊ नागांची पूजा करण्याची परंपरा, सुख-समृद्धीसाठी महिला नागाला आपला भाऊ मानून करतात पूजा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. यावेळी हा सण 2 ऑगस्ट, मंगळवारी आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. भविष्य पुराणासह इतर पुराणांमध्येही त्याचे महत्त्व सांगितले आहे. नागपंचमीशी संबंधित एका पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की या दिवशी स्त्रिया सर्पांची भाऊ मानून पूजा करतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी भावाकडून आशीर्वाद मागतात.

पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र सांगतात की, नागपंचमीला नाग देवतेची पूजा केल्याने कुंडलीत राहु-केतूमुळे होणारे दोष दूर होतात. नागपंचमीला काल सर्प दोषाचीही पूजा केली जाते. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात.

देवलोकात नागांना मिळाले आहे विशेष स्थान
सनातन धर्मात पशु-पक्षी यांची देवतांची वाहने म्हणून पूजा करण्याचा नियमही सांगितला आहे. याशिवाय पुराणात नागलोकाचा उल्लेख आहे. यक्ष, गंधर्व आणि किन्नरांसोबतच नागांनाही देव-देवतांच्या जगात विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची पूजाही केली जाते.

ज्योतिषीय महत्त्व
या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्याने हा दोष टाळण्यासाठी नागपंचमीचे व्रत करावे. ज्याला स्वप्नात अनेकदा साप दिसत असेल किंवा सापांची जास्त भीती वाटत असेल, तर नियमानुसार या दिवशी सापाची पूजा करावी. विशेषत: नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने भीती दूर होते.

भविष्य पुराणात नऊ नागांच्या पूजेचा नियम
भविष्य पुराणानुसार नागपंचमीला नऊ नागांची पूजा करण्याचा नियम सांगितला आहे. 1. अनंत 2. वासुकी 3. शेषनाग 4. पद्मनाभ 5. कंबल 6. शंखपाल, 7. धृतराष्ट्र 8. कालिया 9. तक्षक. नागदेवतेचा फोटो चौरंगावर ठेवून पूजन सामग्री अर्पण करून पूजा करावी. नागदेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करावी.

बातम्या आणखी आहेत...