आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे घडवतात नागा साधू:6 वर्षे खडतर तप; स्वत:चे पिंडदान, दीड लाखापर्यंत खर्च; तीन टप्प्यांत दीक्षा... अशी असते पूर्ण प्रक्रिया

हरिद्वार / रितेश शुक्लएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरावर भस्म लपटलेले, लांब जटा असलेले निर्वस्त्र अन् जगाच्या मोहमायेपासून मुक्त जगणाऱ्या नागा साधूंना तुम्ही पाहिले असेल. कुंभमेळ्यात त्यांचा जत्था आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. शरीरावर भस्म आणि हातात चिलीम घेतलेल्या साधूंच्या या जगात सजगत्या प्रवेश मिळत नाही. त्यासाठी किमान ६ तर कमाल १२ वर्षांचे तप, गुरूची सेवा व एखाद्या आखाड्यात नाेंदणी गरजेची असते. देशभरात साधूंचे एकूण १३ आखाडे आहेत. या प्रदीर्घ प्रक्रियेत बराच खर्चही येतो. ५१ हजारांपासून दीड लाखांपर्यंतची रक्कम खर्च होते. नोंदणीची पहिली पावती साडेतीन हजार रुपयांपासून सुरू होत असते.

तीन टप्प्यांत दीक्षा... अशी असते पूर्ण प्रक्रिया
सांसारिक व्यक्तीला सर्वप्रथम नाेंदणीकृत नागा साधूच्या शरणात जावे लागते. ब्रह्मचर्याचे पालन करत गुरूची मनोभावे सेवा करावी लागते. साधना-अनुष्ठानांचा अनुभव घ्यावा लागतो. कमीत कमी सहा वर्षांच्या तपश्चर्येनंतर गुरू संतुष्ट झाले तर नागा साधू म्हणून नोंदणी होऊ शकते.

टप्पा १ : पंच संस्कार
शिष्याचे जिवंतपणीच पिंडदान केले जाते. यासाठी पाच गुरू आवश्यक असतात. २००७ पासून हा संस्कार करणारे राजस्थानचे महंत सूरज पुरी म्हणाले, पाच गुरू भारती, गिरी, सरस्वती, पुरी व दिगंबर संप्रदायातून असणे गरजेचे असते. एका गुरूची दक्षिणा ११ हजार रुपयांपर्यंत असते. दान व ब्राह्मण भोजनाचा खर्च वेगळा. एकूण खर्च ५१ हजारांपर्यंत जाते. शिष्य सक्षम असला तर बरे, अन्यथा संपूर्ण खर्च गुरू उचलू शकतात. शिष्य हे ऋण रोखीने किंवा सेवा करून फेडू शकतो.

टप्पा २ : दिगंबर बनणे
नागा साधू शिष्य बनवू शकतो, मात्र पंच संस्कार करवू शकत नाही. त्यासाठी त्याला दुसऱ्या टप्प्यात दिगंबरमध्ये प्रवेश करावा लागतो. संन्याशाचे अनुभव व प्रभावाच्या आधारे त्याची परवानगी दिली जाते.

टप्पा ३ : सिद्ध दिगंबर
दिगंबर बनल्यानंतर सिद्ध दिगंबर बनणे हा शेवटचा सोपान असतो. यासाठी एखाद्या आखाड्यामध्ये नाेंदणीची गरज नसते. ही उपाधी तपाने मिळवलेल्या शक्तींच्या आधारे आखाडे मानद डिग्री म्हणून देत असतात.

आखाड्याच्या दोन पावत्या : दुसऱ्या टप्प्यातही नागा संन्याशांना आखाड्याची पावती फाडावी लागत असते. एक पावती टोकन मनी म्हणून ७१०० रुपयांची फाडली जाते. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २१ हजारांची दुसरी पावतीही फाडली जात असते. अनुष्ठानांचा खर्च पकडून संपूर्ण प्रक्रियेचा खर्च सुमारे ३० हजार रुपयांपर्यंत येतो.

कुणालाही नागा बनता येत नाही : कठीण तप आणि गुरूच्या सेवेनंतरही प्रत्येक व्यक्ती नागा साधू बनू शकत नाही. आखाडे हे इतक्या सहजपणे नागा साधू बनण्याची परवानगी देत नाहीत. जूना आखाड्याचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय कोतवाल महंत चेतन पुरी यांनी सांगितले की, यंदा आखाड्याकडे ३ हजार अर्ज आले होते. फक्त १ हजार जणांनाच नागा संन्याशी बनवले जात आहे. इतर आखाड्यांनी अद्याप संख्येची घोषणा केलेली नाही.

स्थानमाहात्म्य : उज्जैनचे खुनी, हरिद्वारचे बर्फानी, नाशिकचे खिचडी
हरिद्वार कुंभ : येथे दीक्षा मिळालेल्या नागा साधूंना बर्फानी म्हणतात. हे साधू क्रोध न करता शांततेने साधना करत असतात.
नाशिक कुंभ : येथे दीक्षा घेतलेल्या साधूंना खिचडी नागा म्हणतात. ते शांत किंवा उग्र वा दोन्हीही असू शकतात.
उज्जैन कुंभ : येथे दीक्षा घेणाऱ्या नागा संन्याशांना खुनी नागा असे म्हटले जाते. हे साधू स्वभावाने अत्यंत कोपिष्ट असतात.
प्रयाग कुंभ : संन्यास घेऊन जे राजयोगाची कामना करतात, ते येथे दीक्षा घेतात. त्यांना राज - राजेश्वर नागा म्हणतात.

असा होतो संस्कार :
- शिष्याला जानवे-कंठी घातली जाते. हे संकल्पाचे प्रतीक आहे.
- शिष्य निसर्गाप्रति लीन व्हावा म्हणून वस्त्रांचा त्याग करून दिगंबर होण्यासाठी प्रेरित केले जाते.
- शरीरावर स्मशानाच्या ताज्या राखेने शृंगार केला जातो. त्यातून स्वत:चे पिंडदान दर्शवले जाते.

बातम्या आणखी आहेत...