आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपंचमी 2020:यावर्षी घरातच अशाप्रकारे करा नागदेवाची पूजा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार श्रावण शुक्ल पंचमी तिथीला (25 जुलै, शनिवार) नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे घरातच नागदेवाची पूजा करावी. असे मानले जेते की, जो व्यक्ती या दिवशी नागाची विधिव्रत पूजा करतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कधीही सापाची भीती राहत नाही.

पूजन विधी
नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात पहिले शंकराचे ध्यान करावे त्यानंतर नाग-नागीण जोडीच्या प्रतिमे ( सोने, चांदी किंवा तांब्यापासून निर्मित)ची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, कबल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या नऊ नागांच्या नामावालीचे नामस्मरण करून फुले, हरभरे, लाह्या वाहाव्या व दुध पाजावे.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।
तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।

- त्यानंतर व्रत-उपवास करण्याचा संकल्प करावा. नाग-नागीण प्रतिमेला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून अक्षता, गंध, फुल अर्पण करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून खालील स्तोत्र म्हणावे.
सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।।
ये च हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:।
ये च वापीतडागेषु तेषु सर्वेषु वै नम:।।

प्रार्थनेनंतर नाग गायत्री मंत्राचा जप करावा
ऊँ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्।

नागपंचमी कथा...
नागपंचमी कथा प्राचीन काळी एका नगरात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. एके दिवशी शेतकरी शेतामध्ये नांगर चालवत असतो. शेत नांगरत असताना नांगराखाली एका नागिणीच्या मुलांचा जीव जातो. मुलांना मृत पाहून नागिणीला खूप दुःख होते. क्रोधामध्ये येऊन नागीण शेतकऱ्याला, त्याच्या पत्नी आणि मुलाला दंश करते. त्यानंतर ती शेतकऱ्याच्या मुलीला दंश करण्यासाठी जाते परंतु शेतकऱ्याची मुलगी दुधाची वाटी घेऊन नागपंचमीच्या व्रत करताना नागिणीला दिसते. हे पाहून नागीण प्रसन्न होते. ती मुलीला वर मागण्यास सांगते. शेतकऱ्याची मुलगी आपल्या आई-वडील आणि भावाला जिवंत करण्याचा वर मागते. नागीण प्रसन्न होऊन त्या सर्वांना जिवंत करते. तेव्हापासून मान्यता आहे की, श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने नागांकडून कोणत्याही प्रकराची भीती राहत नाही.