आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा संयोग:नवीन संवत्सर सुरू होताच राशी बदलतील सर्व 9 ग्रह, 3 राजयोगात सुरु होईल यश आणि आर्थिक बळ देणारे संवत्सर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीपासून नवीन संवत्सर 2079 सुरू झाले आहे. या वर्षी नवसंवत्सर सुरू होताच सर्व नऊ ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. हा स्वतःच एक अनोखा योगायोग आहे. कारण गुरु, शनि आणि राहू-केतू एकाच राशीत बराच काळ राहतात. हे मोठे ग्रह आहेत. त्यामुळे त्यांचा राशी बदल अधिक खास मानला जातो. गुरु 13 महिन्यांत, शनि अडीच वर्षांनी आणि राहू-केतू दीड वर्षांनी राशी बदलतात.

या नवीन संवत्सराचे नाव नल आहे. याचा राजा शनि आणि मंत्री गुरु असेल. भारतीय दिनदर्शिकेनुसार आजपासून जगातील 1 अब्ज 97 कोटी 29 लाख 40 हजार 124वे वर्ष सुरू झाले आहे. सुमारे 2 अब्ज वर्षांपूर्वी या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती.

3 राजयोगात होईल सूर्योदय
या वेळी नवीन वर्षाची सुरुवात रेवती नक्षत्रात सरल, सत्किर्ती आणि वेशी या राजयोगात होत आहे. यामुळे नवरात्रीमध्ये खरेदी, व्यापार, गुंतवणूक आणि नवीन कामे सुरू करणे शुभ राहील. या योगांचे शुभ परिणाम वर्षभर दिसून येतील. या कारणास्तव, अनेक लोकांसाठी हे वर्ष यश आणि आर्थिक ताकदीचे वर्ष असेल. यावर्षी जनतेच्या हिताच्या योजना आखून त्यावर काम केले जातील. हे अनेक लोकांसाठी मोठ्या बदलाचे वर्ष असेल.

देशासाठी संवत 2079 कसे असेल... (पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार)

टॅक्स आणि महागाईत वाढ होण्याचे योग
देशात महागाई आणि कर वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच सरकारच्या तिजोरीतही वाढ होणार आहे. शिक्षण, वाहतूक आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित काम सुरू होईल. गरीब वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना सरकारकडून आकर्षक ऑफर मिळतील. सोने आणि परकीय चलनाच्या किमतीत अस्थिरता असेल. पेट्रोल, डिझेल आणि तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांची मेहनत वाढेल, पण उत्पन्न कमी राहील.

देशाच्या पूर्वेकडील राज्यांना शेतीचे नुकसान होऊ शकते. उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक पाऊस आणि पिके होतील. पश्चिमेकडील राज्यांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. देशातील मध्य राज्यांमध्ये पीक कमी होईल. धान्याचे भाव वाढतील.

राजकारणात मोठे बदल घडण्याचे योग
देशाच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. नवे चेहरे दिसतील. राजकीय मुत्सद्देगिरीमुळे नेत्यांमध्ये मतभेद वाढतील आणि विसंवादाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे बडे नेते आणि सरकारी योजनांवर लोक नाराज असतील. काही छोट्या नेत्यांच्या कामावर जनता समाधानी राहील. काही नेते पद गमावू शकतात.

युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होऊ शकते. शेजारी देशांसोबत तणाव वाढू शकतो. अनपेक्षित घटना घडतील. युद्ध होणार नाही, पण अशी परिस्थिती नक्कीच तयार होईल. राजकारणाचा लष्करावर वाईट परिणाम होईल.

अपघात आणि वाद वाढतील
देशात वाद होतील. चोरी, दरोडा, अपहरण आणि बलात्काराचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण राहील. नवीन-जुन्या आजारांमुळे लोकांना त्रास होऊ शकतो. भूकंप, जाळपोळ, जहाज आणि विमानांचे अपघात होण्याचा धोका आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

तुमच्या राशीसाठी काहीसे असे असेल विक्रम संवत 2079...
मेष : नोकरीत बढतीची शक्यता आहे. पण चिंता आणि शारीरिक अस्वस्थता राहील.
वृषभ : भाग्योदय होईल. तुम्हाला प्रॉपर्टीत फायदा होईल. पण कामात मन लागणार नाही.
मिथुन : शुभ काम होतील. मेहनत जास्त असेल. कुटुंबात वाद, तणाव आणि फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कर्क : चांगल्या गोष्टी घडतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे, पण खर्च वाढेल. आजार होण्याचीही शक्यता आहे.
सिंह : नोकरी-व्यवसायात लाभ होईल. प्रॉपर्टीशी संबंधित कामे होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कन्या : अपघात, तणाव आणि वाद होण्याची शक्यता आहे. लोकांशी मतभेद होतील. शुभ कार्य घडतील.
तूळ : व्यवसायात लाभ होईल, परंतु व्यवहारात सावधगिरी बाळगा. फसवणूक होऊ शकते. प्रवास आणि धावपळ होईल.
वृश्चिक : नोकरी-व्यवसायात आणि प्रॉपर्टीच्या कामात फायदा होईल. वाद आणि कामात विलंब होण्याचीही शक्यता आहे.
धनु : मानसिक आर्थिक चिंता राहील. काम करावेसे वाटणार नाही. अधिक मेहनतीने ठरवलेले काम पूर्ण होईल.
मकर : नोकरीत असंतोष, स्थान बदल, वाद, नुकसान होण्याची शक्यता आहे. इच्छित कामे उशिराने पूर्ण होतील.
कुंभ : धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. कामात अडथळे येतील. जुन्या चुकांमुळे अडचणी वाढतील.
मीन : अनावश्यक खर्च वाढतील, परंतु नियोजित कामे पूर्ण होतील. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल.

बातम्या आणखी आहेत...