आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शारदीय नवरात्र नवदुर्गा उपासनेचा पुण्यकाळ आहे. प्रत्येक वर्षी श्राद्धपक्ष समाप्त होताच नवरात्र सुरु होते परंतु यावेळी अधिक मासामुळे नवरात्र 25 दिवसानंतर म्हणजे 17 ऑक्टोबरपासून सुरु होत असून 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. काशीचे ज्योतिषाचार्य पं. गणेश मिश्र यांच्यानुसार अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी असूनही नवरात्रीमध्ये देवी उपासनेसाठी पूर्ण 9 दिवस मिळतील.
यासोबतच प्रॉपर्टी, गाडी आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त राहील. देवी भागवतनुसार यावेळी शनिवारी घटस्थापना असल्यामुळे देवीचे वाहन घोडा राहील. याच्या प्रभावाने शेजारील देशांपासून तणाव वाढण्याची शक्यता आहे तसेच देशातील राजकारणातही उलथा-पालथ होऊ शकते.
अष्टमी आणि नवमी 24 ऑक्टोबरला
पं. मिश्र यांच्यानुसार 17 ऑक्टोबरला प्रतिपदा म्हणजे पहिल्या तिथीला घटस्थापना केली जाईल. त्यानंतर 18 तारखेला नवरात्रीचा दुसरा दिवस, 19 ला तिसरा, 20 ला चौथा, 21 ला पाचवा, 22 ला सहावा, 23 ला सातवा दिवस राहील. 24 तारखेला सूर्योदयाच्या वेळी अष्टमी आणि दुपारनंतर नवमी तिथी राहील. यामुळे धर्मसिंधू ग्रंथानुसार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विजय मुहूर्तामध्ये दशमी तिथी असल्यामुळे 25 ऑक्टोबरला विजयादशमी साजरी केली जाईल.
प्रत्येक दिवशी शुभ मुहूर्त
पं. मिश्र यांच्यानुसार यावेळी घटस्थापना शुभ मुहूर्तामध्ये होईल. म्हणजेच सर्वार्थसिद्धी योगामध्ये नवरात्रीची सुरुवात होत आहे. ज्योतिषमध्ये या योगाला अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच विजयादशमीपर्यंत खरेदीसाठी त्रिपुष्कर, सौभाग्य आणि रवियोगासारखे खास मुहूर्तही राहतील. या शुभ योगामध्ये प्रॉपर्टी, गाडी, फर्निचर, भौतिक सुख-सुविधांच्या वस्तू खरेदी करणे शुभ राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.