आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

17 ऑक्टोबरला घटस्थापना:यावर्षी पितृपक्ष अमावस्येनंतर सुरु होणार नाही नवरात्री, 18 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत नाही कोणताही मोठा सणवार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशी होते अधिक महिन्याची गणना

प्रत्येक वर्षी पितृ पक्षातील अमावस्येनंतर अश्विन मासातील नवरात्री सुरु होते. परंतु यावर्षी असे होणार नाही. 17 सप्टेंबरला सर्वपितृ मोक्ष अमावस्या आहे. त्यानंतर 18 तारखेपासून अधिक मास सुरु होत आहे. हा मास 16 ऑक्टोबरपर्यंत राहील. या काळात कोणताही मोठा सणवार नाही. 17 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून नवरात्र सुरु होईल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 19 वर्षानंतर पश्विम महिन्याचा अधिकमास राहील. यापूर्वी 2001 मध्ये हा मास आला होता. 17 ते 25 ऑक्टोबरपर्यंत नवरात्री, 26 ऑक्टोबरला विजयादशमी आणि 14 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाईल. श्राद्ध पक्षानंतर अधिक मासात कोणताही मोठा सण राहणार नाही. या महिन्यात चतुर्थी (20 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर), एकादशी (27 सप्टेंबर आणि 13 ऑक्टोबर) पौर्णिमा (1 ऑक्टोबर) आणि अमावस्या (16 ऑक्टोबर) या विशेष तिथी राहतील.

अशी होते अधिक महिन्याची गणना
कालगणनेच्या दोन पद्धती आहेत. पहिली सूर्याच्या गतीनुसार आणि दुसरी चंद्राच्या गतीनुसार. सूर्याच्या गतीवर सौर वर्ष आधारित असते, तर चांद्र वर्ष चंद्राच्या गतीवर. एक राशी पार करण्यासाठी सूर्य ३०.४४ दिवस घेतो. या प्रकारे सूर्याला १२ राशी पार करण्यासाठी म्हणजे सौर वर्ष पूर्ण करण्यास ३६५.२५ दिवस लागतात, तर ३५४.३६ दिवसांत चंद्राचे एक वर्ष पूर्ण होते. जवळपास प्रत्येक तीन वर्षांनंतर (३२ महिने, १४ दिवस, ४ तास) चंद्राचे हे दिवस जवळपास एक महिन्याच्या बरोबरीचे होतात. यामुळे ज्योतिषीय गणना योग्य ठेवण्यासाठी तीन वर्षांनंतर चांद्रमासामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक महिना म्हटले जाते.

अधिकाला पुरुषोत्तम महिना का म्हणतात?
पौराणिक कथांनुसार, मल मास असल्याने या महिन्याचा स्वामी होण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. तेव्हा या महिन्याने भगवान विष्णंूना आपल्या उद्धारासाठी प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वत:चे पुरुषोत्तम हे श्रेष्ठ नाव दिले. तसेच या महिन्यात जो भागवत कथा श्रवण, मनन, भगवान शंकराचे पूजन, धार्मिक अनुष्ठान, दान करेल त्याला अक्षय फळ मिळेल, असा आशीर्वादही दिला.