आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शारदीय नवरात्रोत्सव:मोजक्या पुजारी, सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके पुजारी, सेवेकरी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली. तत्पूर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग घासून पुसून स्वच्छ धुवून घेतला तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. दरम्यान आठ दिवसांची मंचकी निद्रा संपवून पुन्हा दि. १७ ऑक्टोबरला पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल.

शुक्रवारी सकाळपासूनच सेवेकरी पलंगे यांनी देवीचा चांदीचा पलंग घासून पुसून स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेतल्या. यावेळी गणेश, विनोद, अर्जुन, नेताजी, बब्रुवान, सुनील, दशरथ, प्रशांत, जगदीश, अरूण आदी पलंगे सेेेवेेकऱ्यांनी परिश्रम घेतले. त्याचवेळी मोजक्याच महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजून घेतला. यावेळी मानकरी मंगेश निकते यांनी गाद्या शिवल्या तर नागेश कुलकर्णी यांनी गाद्या शिवण्यास मदत केली. त्यानंतर नवीन गाद्या पलंगावर ठेवण्यात येऊन मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज ठेवण्यात आला.

देशभरातील ५१ शक्तीपीठांपैकी केवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी एकमेव चलमूर्ती असून अन्य ठिकाणी उत्सव मूर्ती हलवण्यात येते. तुळजाभवानी देवी वर्षभरात तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी मंचकी निद्रा घेत असते.

मुस्लिम समाजाला कापूस पिंजण्याचा मान
मातेच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे. शम्मू बाशुमिया पिंजारी यांच्याकडे परंपरेनेे हा मान चालत आलेला आहे. शम्मू पिंजारी यांनी गाद्यांचा कापूस पिंजला त्यांना त्यांच्या पत्नीने सहाय्य केले. सायंकाळी अभिषेक पूजेनंतर खंडोबाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून आई राजा उदो उदोच्या जयघोषात देवीची मूर्ती सिहांसनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser