आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीत दूर होऊ शकतो स्ट्रेस:मेडिटेशन करण्यासाठी नवरात्री आहे सर्वोत्तम, भक्तीसोबतच मन ठेवू शकता शांत

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 26 सप्टेंबरपासून देवी दुर्गाच्या नऊ दिवसीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा करण्यासोबतच जप आणि ध्यान करण्याचीही परंपरा आहे. देवी मंत्रांसोबत करण्यात आलेल्या ध्यानाने भक्ती होते, वाईट विचार नष्ट होतात आणि मनाला शांती मिळते.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, नवरात्रीचा काळ आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. दोन ऋतूंमधील हा काळ आहे. पाऊस संपत असून हिवाळा सुरू होत आहे. शारदीय नवरात्र या दोन ऋतूंमध्ये म्हणजेच संधिच्या काळात येते. जाणून घ्या नवरात्रीशी संबंधित काही खास प्रश्नांची उत्तरे पं शर्मा यांच्याकडून जाणून घ्या...

नवरात्रीत व्रत-उपवास केल्याने काय फायदे होतात?
आता ऋतूंच्या संधीकाळाची वेळ आहे. या दिवसात वातावरण बदलामुळे होणारे आजार होण्याची शक्यता वाढते. इच्छा नसतानाही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. हवामानात झपाट्याने बदल होतो, आपले शरीर त्या झपाट्याने स्वतःशी जुळवून घेऊ शकत नाही आणि सर्दी, खोकला, मानसिक तणाव, वेदना, अपचन, गॅस, ऍसिडिटी अशा समस्या उद्भवू लागतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास आणि ध्यान केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर या आजारांशी लढण्यासाठी तयार होते.

तणावापासून दूर राहण्यासाठी रोज करावे ध्यान

  • घरातील मंदिरात किंवा इतर कोणत्याही मंदिरात देवीची विधिवत पूजा करावी. पूजा केल्यानंतर पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसावे.
  • आपले मन शांत करावे आणि डोळे बंद करा. यानंतर तुमचे पूर्ण लक्ष दोन्ही डोळ्यांमधील आज्ञा चक्रावर केंद्रित करा.
  • ध्यान करताना श्वास घेण्याची आणि सोडण्याची गती सामान्य ठेवावी. अशाप्रकारे ध्यान करावे. सुरुवातीला विचारांचा प्रवाह मनात राहतो, पण काही वेळाने ध्यान करताना मनात विचार राहत नाहीत.
  • अशाप्रकारे ध्यान केल्याने मन एकाग्र होऊ लागते आणि अशांती दूर होते.