आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनमधील व्रत-उत्सव:वर्षभरातील सर्व एकादशींएवढे पुण्य देणारी निर्जला एकादशी 10 जून रोजी, पौर्णिमा 14 जूनला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेक विशेष सण-उत्सव साजरे केले जातील. गंगा दशहरा, पौर्णिमा, योगिनी एकादशी, अमावस्या तिथी जूनमध्ये आहे. या महिन्यात 30 जूनपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होणार आहे. जाणून घ्या महिन्याच्या खास तारखा आणि त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी...

गुरुवार, 2 जून रोजी रंभाव्रत आहे. या तिथीला अप्सरा रंभाची पूजा सौभाग्य आणि सुंदर स्वरूप प्राप्त होण्याच्या इच्छेने केली जाते.

शुक्रवार, 3 जून रोजी विनायकी चतुर्थी आहे. या दिवशी नवतापाची समाप्ती होईल. चतुर्थी तिथीला गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे.

गुरुवार, 9 जूनला गंगा दशहरा आहे. या तिथीला गंगा नदीची पूजा केली जाते. हा सण पाण्याचे महत्त्व सांगतो.

शुक्रवार 10 जून रोजी निर्जला एकादशी आहे. वर्षातील सर्व एकादशींमध्ये या एकादशीचे महत्त्व सर्वाधिक आहे. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांना वर्षभरातील सर्व एकादशींइतकेच पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. हे व्रत निर्जल राहून केले जाते. म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात.

प्रदोष व्रत रविवार, 12 जून रोजी आहे. या दिवशी शिव आणि पार्वतीची विशेष पूजा करावी.

मंगळवार, 14 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आहे. या दिवशी वटसावित्री व्रत केले जाते तसेच संत कबीर यांची जयंती देखील आहे.

बुधवार, 15 जूनपासून ज्येष्ठ कृष्ण पक्ष सुरू होत आहे. मिथुन संक्रांती 15 जून रोजी आहे. या दिवशी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. संक्रांतीच्या दिवशी नदीत स्नान करून दानधर्म करण्याची परंपरा आहे.

शुक्रवार, 17 जून रोजी गणेश चतुर्थी व्रत आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते.

योगिनी एकादशी शुक्रवार, 24 जून रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशीला भगवान विष्णूचे व्रत करावे.

रविवार, 26 जून रोजी प्रदोष व्रत आहे.

मंगळवार, 28 जून रोजी दर्श अमावस्या आहे. या तिथीला पितरांचे श्राद्ध करावे. पंचांगाच्या फरकामुळे 29 जूनलाही अमावस्या असेल.

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला गुरुवार, ३० जूनपासून सुरुवात होणार आहे. गुप्त नवरात्रीत महाविद्येसाठी साधना केली जाते.

बातम्या आणखी आहेत...