आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 जून रोजी निर्जला एकादशी:दिवसभर पाणी न पिता केला जातो उपवास, द्वापार युगात भीमाने केले हे व्रत

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी म्हणून साजरी केली जाते. याला पांडव आणि भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. यावेळी शुक्रवार, 10 जून रोजी ही एकादशी आहे. या दिवशी भक्त दिवसभर पाणी न पिता भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करतात. यासोबतच पाण्याने भरलेल्या भांड्यावर आंबा, साखर, पंखा, ठेवून दान करतात. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, या एकादशीला उपवास केल्याने वर्षातील सर्व एकादशींएवढे पुण्य मिळते. असे शास्त्रात लिहिले आहे. त्यामुळे या एकादशीला पितरांच्या शांतीसाठी थंड पाणी, अन्न, वस्त्र, छत्री, पादुका दान केले जातात.

निर्जला एकादशी का म्हणतात
डॉ मिश्र यांच्या मते, या तिथीला पाणी न पिता उपवास केला जातो, म्हणूनच याला निर्जला एकादशी म्हणतात. उपवास करणारे भक्त पाणीही पीत नाहीत. भगवान विष्णूची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला पूजा करून अन्न ग्रहण करावे.

महाभारत काळात भीमाने हे व्रत केले होते
स्कंदपुराणात एकादशी माहात्म्य नावाचा अध्याय आहे. त्यात वर्षभरातील सर्व एकादशींची माहिती देण्यात आली आहे. या अध्यायात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. निर्जला एकादशीबद्दल पांडवपुत्र भीमाशी संबंधित एक कथा आहे. महाभारत काळात भीमाने या एकादशीचे व्रत केले होते. तेव्हापासून याला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात.

हे व्रत महर्षी वेद व्यास यांनी पांडवांना अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ धर्मासाठी सांगितले होते. तेव्हा भीम म्हणाला की महर्षी, तुम्ही महिन्यातून दोन एकादशीचा उपवास करण्याविषयी बोललात. मी एक दिवसही अन्नाशिवाय जगू शकत नाही, अगदी एक वेळही. वेद व्यासांनी भीमाला सांगितले की, केवळ निर्जला एकादशीच वर्षातील सर्व एकादशींचे पुण्य देऊ शकते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हे व्रत केले जाते. त्यानंतर भीमाने या दिवशी उपवास केला.

बातम्या आणखी आहेत...