आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मान्यता :अष्टवसू आणि बारा आदित्य सहित 33 कोटी देवतांना मानले जाते 33 करोड देवी-देवता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदू धर्मात 33 कोटी देवता? जाणून घ्या... कसे

भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थक एकच. तरीही शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. हिंदू धर्मानुसार 330000000 देवी-देवता आहेत असे मानले जाते. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. याविषयी अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की खरोखरच 33 कोटी देवी देवता असतील का? वेद-पुरांणांमध्ये 33 'कोटी' देवी देवता असल्याचे म्हटले आहे. 

येथे कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे. कोटी म्हणजे भरपूर. येथे असलेला 'कोटी' हा शब्द करोड या अर्थाने घेण्यात येऊ लागला. त्यामुळे असे मानले जाऊ लागले की हिंदूंमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. वास्तवात 33 'कोटी' देवी देवता आहेत. 33 कोटीत आठ वसु(अष्टवसू), अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे. काही शास्त्रामध्ये इंद्र आणि प्रजापती यांच्या जागी दोन अश्विनीकुमारांचा समावेश केला जातो. 

आठ वसूंमध्ये : आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभाष यांचा समावेश आहे.

अकरा रूद्र पुढीलप्रमाणे आहेत - मनु, मन्यु, शिव, महत, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत ध्वज.

बारा आदित्य पुढीलप्रमाणे - शुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू. 

ईश्वर हा एक आहे आणि तो वेगवेगळ्या रूपांतून व्यक्त होतो, हा हिंदू धर्मांतील एक मूलभूत सिद्धांत आहे. विविध गुण आणि स्वभावांच्या लोकांसाठी अनेक देवतांची रूपे आहेत. त्यामुळे देवतांची संख्या 33 कोटी मानण्यात आली तरी त्यात तात्विक दृष्ट्या चुकीचे असे काहीच नाही. ईश्वर अनंत आहे. तो अनंत रूपांतून व्यक्त होतो, असा विशाल भाव हिंदू धर्मातून मांडण्यात आल्यामुळे 33 कोटी देवता आहेत अथवा नाहीत हा भाग गौण ठरतो.

0