आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिनी एकादशी 12 मे रोजी:या दिवशी भगवान विष्णूंसोबत तुळस आणि पिंपळाची पूजा केल्याने मिळते व्रताचे पूर्ण फळ

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 12 मे रोजी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी संपूर्ण दिवस आहे. याला मोहिनी एकादशी असेही म्हणतात. या तिथीला भगवान श्रीविष्णूसोबत पिंपळ आणि तुळशीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. असे केल्याने या व्रताचे पूर्ण फळ मिळते. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीविष्णूंचा वास मानला जातो. त्याचबरोबर तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंच्या अवतारांची विशेष पूजा करण्याचीही परंपरा आहे. या एकादशीला भगवान विष्णूसाठी उपवास केला जातो. या व्रतामध्ये सकाळी लवकर पिंपळाची पूजा करण्याचा नियम आहे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात.

पिंपळाची पूजा : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पिंपळाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल, कच्चे दूध आणि तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे केल्याने भगवान श्रीविष्णूंची कृपा प्राप्त होते आणि पितरही संतुष्ट होतात.

तुळशीची पूजा: भगवान शाळीग्रामला दूध आणि पाण्याने अभिषेक करून पूजन साहित्य अर्पण करावे. थोडेसे अभिषेक केलेले पाणी स्वतः प्यावे आणि बाकीचे तुळशीला अर्पण करावे. यानंतर तुळशीमातेची हळद, चंदन, कुंकुम, अक्षत, फुले व इतर पूजा साहित्याने पूजा करावी.

जलदानाने अनेक यज्ञ आणि तीर्थयात्रेचे फळ
या एकादशीला दान केल्याने दारिद्र्यातून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. सर्व प्रकारचे दान केल्याने आणि अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य वैशाख महिन्यातील या एकादशीला जलदान केल्याने मिळते, असेही मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुळस आणि पिंपळांना जल अर्पण करावे. यासोबतच लोकांना पिण्याचे पाणी द्यावे.

बातम्या आणखी आहेत...