आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:सर्वोत्तम होण्याचे ध्येयवेडच तुम्हाला यशस्वी बनवेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्यापैकी कुणीही गर्दीचा भाग होऊ इच्छित नाही, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत सर्वोत्तम बनू शकतो.

प्रत्येकात सर्वोत्तम बनण्याची इच्छा असली पाहिजे. उदा. तुम्हाला विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश हवा होता. ते अव्वल दर्जाचे होते, हेे त्यामागचे कारण. मात्र, प्रवेश मिळाला नाही. हरकत नाही. ते तुमच्या हाती नव्हते. पण, तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयात जात आहात. तिथे सर्वोत्तम बनण्यासाठी तुम्ही कशी सुरुवात करू शकाल, हे पाहा. काहीही करा, गँगचे लीडर बना, अभ्यास करा, खेळा किंवा सांस्कृतिक उपक्रमांत भाग घ्या. काहीही करा, पण त्यात पहिल्या क्रमांकावर राहा. सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यात हा विचार असला पाहिजे की, मी गर्दीतला एक बनण्यासाठी इथे आलेलो नाही. मी सर्वोत्तम बनू शकतो. मी अव्वल होऊ शकतो. हा गुण मी जीवनात यशस्वी झालेल्या सर्व लोकांमध्ये पाहिला आहे. या मंडळींमध्ये कामात सर्वश्रेष्ठ होण्याचा ध्येयवेडेपणा होता. काम कोणतेही असेल, मात्र त्या सर्वात ध्येयवेड होते. तुम्ही काय बनावे हे सारे जग सांगत असलेलेच काम असले पाहिजे असे नाही. पण, कुठे ना कुठे माझ्या जीवनात कोणत्या ना कोणत्या अंगाने मला सर्वोत्तम व्हायचे आहे, हा विचारच ध्येयवेड आहे. हे बाहेरून येत नाही. तुमच्या आई-वडिलांना सांगितल्याने येणार नाही. मी सांगितल्यानेही येणार नाही. हे तुमच्यातच कुठेतरी असते. तुमच्या आत, खोलवर हे ध्येयवेड असले पाहिजे. एक ध्येयवेड पाहिजे - मला कोणत्या तरी गोष्टीत, कोणत्या तरी कामात सर्वोत्तम व्हायचे आहे.

मायकल एंजेलो म्हणतात, ‘मी एक साफसफाई कामगार असेन, तर मी जगातील सर्वश्रेष्ठ साफसफाई कामगार बनेन हे निश्चित केले पाहिजे. मी एक कलाकार आहे ही गोष्ट निराळी. परंतु आईने मला सांगितले की, तुला चित्रकार बनायचे आहे तर बन, तुला साफसफाई कामगार व्हायचे असेल तर हो. मला यामुळे फरक पडत नाही. कारण, जे काही करशील ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न कर.’ मुळात हा ध्येयवेडेपणा आतूनच असतो, त्याचा कौशल्याशी संबंध नाही. याचा शोध तुम्ही स्वत:च लावाल. तुमच्यात जर ध्येयवेडेपणा असेल तर तुम्ही ते कौशल्य आपोआपच शोधाल, ज्यात तुम्हाला सर्वोत्तम बनता येईल.

तुम्ही स्वत:मध्ये तो ध्येयवेडेपणा जागृत करावा, असे मला वाटते. गर्दीत हरवणे कुणालाच आवडत नाही. सर्वजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ बनू इच्छितो. आपण कशात श्रेष्ठ बनू इच्छितो, हे प्रत्येक जण शोधेल. कारण, आपल्या सर्वांची शर्यत वेगवेगळी आहे. तुम्ही सारे एकाच शर्यतीचे भाग आहात असा भाव शिक्षण व्यवस्था कदाचित निर्माण करू शकेल. प्रत्येक जण शाळेत अव्वल येऊ इच्छिताे, त्यांना ९८% गुण हवे असतात. आपल्यालाही असे वाटत असेल. परंतु, मुळात आपण प्रत्येक जण आपापल्या शर्यतीत धावत आहोत. माझा विजय तुम्हाला आणि तुमचा विजय मला रोखू शकणार नाही. प्रत्येक जण जीवनात आपापल्या स्थानी आहेत. परंतु, अंतर्मनात कोणता ना कोणता ध्येयवेडेपणा असला पाहिजे.

तुम्हाला वयाच्या विशीपर्यंत ही भावना आपल्यात निर्माण करावी लागेल आणि तुमच्या मुलांनाही यासाठी प्रेरित केले पाहिजे. याचा अर्थ चांगला व्यवहार आणि प्रत्येकाने तुम्हाला पसंत करावे असे नाही, तर तुमच्या अंतरंगात कुठे ना कुठे तसूभर तरी आक्रमकता असलीच पाहिजे. एक असे ध्येय, जे तुम्हाला सांगत असेल की तुला सर्वोत्तम बनायचे आहे.

एकदा का तुमच्यात हा गुण आला की तुमच्या जीवनात होणाऱ्या प्रतिक्रिया पाहा. मिळणाऱ्या संधी पाहा. तसेच यामुळे झालेले बदलही पाहा. जर कुणी तुम्हाला विचारले की, तुम्हाला जीवनात काय बनायचे आहे? तेव्हा ‘मला काय बनायचे माहीत नाही’ असे आपले उत्तर असू नये. तुम्ही काय बनणार आहात, हे माहीत नसले तरी तुमचे उत्तर असे असावे की, ‘जीवनात काय बनायचे आहे, हे माहीत नसले तरी जे काही करेन ते सर्वोत्तमच करेन.’ कशात करेन? हे तुम्हाला नंतर समजेलच.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू
infinitheism.com/wisdom

बातम्या आणखी आहेत...