आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाईफ मॅनेजमेंट:पंचतंत्रातील मित्रभेद अध्यायातील शिकवण, कधीही मुर्खाला सल्ला देऊ नये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्रभेद अध्यायात मित्र आणि शत्रुची ओळख कशी करावी हे सांगितले आहे

पंचतंत्रांच्या गोष्टींमध्ये सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याच्या अनेक गोष्टी आहेत. पंचतंत्र पाच भागांमध्ये विभागला आहे, यात एक मित्रभेद नावाचा धडा आहे. मित्रभेद अध्यायात मित्र आणि शत्रुची ओळख कशी करावी हे सांगितले आहे. त्याच अध्यायामधील एक गोष्ट जाणून घ्या.

पंचतंत्रात लिहीले आहे 

उपदेशो हि मूर्खाणां, प्रकोपाय न शान्तये। 

पयःपानं भुजडाग्नां केवल विषवर्धनम्।।

या नितीमध्ये सांगितले आहे की, मूर्खांना दिलेला सल्ला, त्याच प्रकारे त्यांच्या रागाला वाढवणारा असतो, ज्याप्रमाणे सापांना दुध पाजल्याने त्यांचे विष वाढते.

जाणून घ्या या नीतीशी निगडीत एक गोष्ट 

एका जंगलात मोठे झाड होते. त्या झाडावर एका चिमणीचे जोडपे राहत होते. एके दिवशी जंगलात जोरदार पाऊस पडला. पावसापासून वाचण्यासाठी ती चिमणी आपल्या घरट्यात जाऊन बसली. थोड्यावेळानंतर त्या झाडाखाली एक माकड येऊन बसले. ते पूर्णपणे भिजलेले आणि थंडीने कुडकुडत होते. 

सक्षम असूनही त्या माकडाने आपल्यासाठी एखादा आसरा बनवून ठेवला नव्हता, ते जंगलात इकडे-तिकडे फिरत होते. त्या माकडाला त्या अवस्थेत पाहून चिमणीने त्याला एक घर बनवून त्यात राहण्याचा सल्ला दिला. तिच्या त्या सल्ल्यामुळे माकडाला अपमानित वाटले. त्याला वाटले की, चिमणीकडे स्वतःचे घर आहे आणि माझ्याकडे नाहीये आणि ती माझी मस्करी करत आहेत. क्रोधीत झालेल्या माकडाने त्या चिमणीचे घर मोडले आणि तिलाही बेघर केले.

कथेची शिकवण : पंचतंत्रच्या या कथेनुसार ही शिकवण मिळते की, मुर्खांना सल्ला दिला देऊ नये, असे केल्याने स्वतःचेच नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...