आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:हनुमान हे सेवा, पराक्रम अन् आशेचे अद्भुत रूप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पं. विजयशंकर मेहता

धोक्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो देणारा खास असतो. रावण बिभीषणाला धोकेबाज म्हणाला. पण, प्रभू रामाने त्याला जीवश्च मित्र मानून सत्यनिष्ठ संबोधले. सत्यासाठी कोणीही करू शकणार नाही ते काम बिभीषणाने केले, असे रामाला वाटायचे. रावणाचा वध कसा होईल, हे त्याने सांगितले. रामाने एका बाणात अनेक उद्देश साध्य केले. ‘खैंचि सरासन श्रवन लगि छाड़े सर एकतीस। रघुनायक सायक चले मानहुं काल फनीस।’ बाण एकच सोडला होता, पण सुटल्यानंतर त्याचे एकतीस भाग झाले. कोरोनारूपी रावणही कुठल्या एका प्रयत्नाने मरणार नाही. प्रत्येक व्यक्ती, व्यवस्थेला आपल्या परीने प्रहार करावा लागेल.

आज आपल्या भोवतालचे दृष्य रणांगणासारखे झाले आहे. कुठले सत्य बाहेर काढायचे? कुठले खोटे लपवायचे? प्रत्येक व्यवस्थेत वेगवेगळे रावण आहेत. इतके राम कुठून आणायचे? रामासमोर रावणाचे थैमान पाहून बिभीषणही निराश झाले होते. पण, योग्य वेळी हनुमानांनी मार्गदर्शन केले. हनुमान हे सेवा, पराक्रम आणि आशेचे अद्भुत रूप आहेत. संकटात भलेही मंदिरे बंद असतील, पण रक्षणासाठी त्यांना एक आ‌वाज द्या, ते आपल्या हृदयाच्या दाराशी येऊन उभे राहतील.

बातम्या आणखी आहेत...