आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • Papmochani Ekadashi 2022 Monday, March 28, Significance Of Ekadashi Vrat, Vishnu Puja Vidhi, Shiv Puja Vidhi | Marathi News

व्रत-उपवास:28 मार्चला सोमवार, एकादशी आणि सर्वार्थसिद्धी योग; श्रीविष्णूंच्या चतुर्भुज स्वरूपाची करावी विशेष पूजा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 28 मार्चला फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. याला पापमोचनी एकादशी म्हणतात. या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. एकाशी तिथीला करण्यात आलेल्या व्रत-उपवासाने कळत-नकळत झालेल्या पाप कर्माचे फळ नष्ट होते. यादिवशी श्रीविष्णूंच्या चतुर्भुज स्वरूपाची पूजा केली जाते. सोमवारी एकादशी असल्याने यादिवशी श्रीविष्णूंसोबत महादेवाचीही पूजा अवश्य करावी.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, पापमोचनी एकादशीचे महत्त्व खूप जास्त आहे. या व्रताने सर्व पापकर्मांची फळे नष्ट होतात. प्राचीन काळी एक ऋषी तपश्चर्या करत होते, त्या वेळी एका अप्सरेने ऋषींची तपश्चर्या भंग केली. त्यानंतर अनेक वर्षे ऋषी त्या अप्सरेसोबत राहिले, पण जेव्हा त्यांना समजले की ते भक्तीमार्गापासून दूर गेले आहेत, तेव्हा त्यांनी त्या अप्सरेला पिशाचिनी होण्याचा शाप दिला. नंतर अप्सरेने ऋषींना या शापापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली, तेव्हा ऋषींनी त्याला सांगितले की पापमोचनी एकादशीच्या व्रताने या शापाचा प्रभाव संपेल. या एकादशीला अप्सरेने व्रत केले आणि ती शापातून मुक्त झाली. या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात.

अशाप्रकारे करावी श्रीविष्णूंची पूजा
ज्यांना सोमवारी हे व्रत करायचे आहे, त्यांनी एक दिवस आधी रविवारच्या संध्याकाळपासूनच व्रताची सुरुवात करावी. रविवारी संध्याकाळी साधे अन्न खावे आणि लवकर झोपावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम घरातील मंदिरात गणेशपूजन करावे. गणेशाची पूजा केल्यानंतर विष्णूसमोर व्रत-पूजा करण्याचा संकल्प घ्यावा.

दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करा. वस्त्र, हार, फुले अर्पण करा. गंध लावावे. इतर पूजा साहित्य अर्पण करावे. धूप-दिवा लावा. मिठाईचा नैवेद्य दाखवावा . ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा. त्यानंतर आरती करावी. पूजेनंतर पूजेत झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमा मागावी.

ही आहे शिवपूजेची सोपी पद्धत
सोमवारी तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर जल अर्पण करावे. बेलाची पाने, रुईचे फुल, गुलाब फुले अर्पण करावीत. मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवा लावून आरती करावी.

एकादशीला हे शुभ कार्यही करावेत
एकादशीला श्रीविष्णू आणि महादेवाचे पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. स्नानानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. गरजू लोकांना पैसे आणि अन्नधान्य दान करा.

बातम्या आणखी आहेत...