आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेशोत्सव विशेष:पिता शंकराने क्राेधाने केला प्रहार, गणेशाचे मस्तक झाले वेगळे; पाताळ भुवनेश्वर गुहेच्या 90 फूट आतमध्ये मस्तकाची स्थापना

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदिगणेशाच्या दर्शनासाठी वर्षभर भक्तांची असते माेठी रांग; उत्तराखंडमध्ये आहे हे प्रसिद्ध ठिकाण

पिता शंकराच्या क्राेधाने पार्वती मातेने तयार केलेला बाळ आणि रक्षक असलेल्या गणेशावर माेठा प्रहार झाला. याच प्रहारात त्याचे मस्तक धडावेगळे झाले. हेच मस्तक देशातील एकमेव अशा ठिकाणी स्थापित असल्याचे बोलले जाते. याची स्थापनाही स्वत: भगवान शंकराने केल्याची आख्यायिका आहे. यासाठी स्वत: ब्रह्मकमळ तयार केले आणि त्यामध्ये हे मस्तक ठेवलेले. उत्तराखंडातील पिथौरगडजवळील पाताळ भुवनेश्वर नावाचे हे ठिकाण आहे. या मस्तकाची पूजा करण्यासाठी देशभरातून भाविक माेठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यामुळे हे देशातील एकमेव ठिकाण मानले जाते. असलेल्या पाताळ भुवनेश्वर नावाच्या गुहेत हे मस्तक आहेे. या गुहेचा शोध आदिशंकराचार्यांनी लावला असेही सांगितले जाते. गुहेत भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. एका प्रचंड डोंगरात ९० फूट आतमध्ये ही विशाल गुहा आहे.

आदिगणेशाच्या मुखात थेंब-थेंब पडते ब्रह्मकमळातील पाणी
पार्वतीदेवी स्नानाला गेल्या असताना पहाऱ्यावर गणेशाला बसवले गेले होते. महादेवांनाही गणेशाने आत न सोडल्याने त्यांनी संतापून गणेशाचे मस्तक धडावेगळे केले. नंतर पार्वती मातेचा राग शांत करण्यासाठी त्याला हत्तीचे मस्तक लावले. पण मूळ असलेले मस्तक शंकराने या गुहेत स्थापित केले. येथे गणेशाची मस्तक नसलेली मूर्तीही आहे. त्यालाच आदिगणेश असे म्हणतात. या मूर्तीवरच १०८ पाकळ्यांचे ब्रह्मकमळ दगडात कोरलेले आहे. या कमळातून थेंबाथेंबाने खालच्या प्रतिमेवर पाणी पडते. हे पाणी आदिगणेशाच्या मुखात पडताना येथे आपल्याला प्रत्यक्षात पाहता येते.

कलियुगाची दगडी प्रतिमा आहे गुहेत
या गुहेत चार युगांच्या चार प्रतिमा दगडरूपात आहेत. त्यातली एक कलियुगाची आहे असे म्हटले जाते. हा प्रतिमारूपी दगड हळूहळू वर येतो आहे. तो वरच्या खडकाला जेव्हा मिळेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल अशी आख्यायिकाही आहे. याच गुहेत केदारनाथ, बद्री व अमरनाथाचेही दर्शन घेता येते. ब्रदीजवळ यम कुबेर, वरुण, लक्ष्मी गणेश, गरुड यांच्या दगडातील मूर्ती आहेत. तक्षक नागाची प्रतिमाही आहे. खडकातील या पंचायतनाच्या वर अमरनाथाची गुहा आहे. त्याला दगडी जटा आहेत. येथेच शेष नागही आहे. म्हणजे खडकाचा आकार नागाप्रमाणे आहे. येथे कालभैरवाची जीभही पाहता येते. असे मानतात की या कालभैरवाच्या मुखातून जो शेपटीपर्यंत जाईल त्याला मोक्ष मिळतो.